agriculture news in marathi,agitation for maratha reservation, satara, maharashtra | Agrowon

आरक्षणासाठी सातारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलन

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 जुलै 2018

सातारा  ः मराठा आरक्षणासाठी गुरुवारी (ता. २६) जिल्ह्यातील जावली, फलटण येथे मोर्चा काढण्यात आला. जावली येथे कडकडीत बंद पाळून दांडा मोर्चा काढण्यात आला. फलटण शहरात मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात आले. म्हसवड येथे सातारा-पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सातारा  ः मराठा आरक्षणासाठी गुरुवारी (ता. २६) जिल्ह्यातील जावली, फलटण येथे मोर्चा काढण्यात आला. जावली येथे कडकडीत बंद पाळून दांडा मोर्चा काढण्यात आला. फलटण शहरात मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात आले. म्हसवड येथे सातारा-पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मेढा येथे पाच तरुणांनी तीन मजली इमारतीवर चढून आत्महत्येचा इशारा दिला होता.  
जिल्हाधिकारी किंवा मुख्यमंत्री चर्चेला आल्याशिवाय इमारतीवरून खाली उरणार नाही, अशी भूमिका घेऊन मेढ्यातील मराठा क्रांती मोर्चा आंदोलनात सहभागी पाच युवक तेथील तीन मजली इमारतीवर चढले होते. आमच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करू असा इशारा त्यांनी दिला. या वेळी सातारा प्रातांधिकारी स्वाती देशमुख यांनी या घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांची समजूत काढल्यानंतर हे आंदोलक खाली उतरले.

जावळी येथे कार्यकर्त्यांनी दांडा घेऊन मोर्चा काढून काढला. जावली तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. फलटण येथे अत्यंत शांततेत मराठा समाजाचे आंदोलन सुरू झाले आहे. गुरुवारी सकाळपासून तालुक्यातील विविध भागांतून मोटार, मोटारसायकलला भगवे झेंडे लावत मोठ्या संख्येने मराठा समाजातील युवक तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर येऊन घोषणा देत उभे राहिले होते. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. या वेळी महिलांनी मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी जाधव यांना दिले. ठिय्या आंदोलनाप्रसंगी मान्यवरांनी मराठा समाजाची भूमिका विविधांगाने स्पष्ट केली. शहरासह सर्व तालुक्यांत बंद पाळण्यात आला. म्हसवड कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच सातारा-पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...