मराठा अारक्षणासाठी अकोल्यात उत्स्फूर्त बंद

मराठा आरक्षणासाठी आंदोलन
मराठा आरक्षणासाठी आंदोलन

अकोला  ः मराठा समाजाला अारक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या अांदोलनाला पाठिंबा देण्याकरिता बुधवारी (ता.२५) अकोला बंदचे अावाहन करण्यात अाले. कुठलीही अनुचित घटना न घडता हा बंद शांततेत पार पडला.

अकोला शहरासह जिल्ह्यात तेल्हारा, पातूर, बाळापूर व इतर ठिकाणी सकल मराठा व मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बंद यशस्वी केला.‘बंद’चे अावाहन करण्यात अाल्याने अकोल्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने बुधवारी बंद होती. बाजारपेठेत दुपारपर्यंत शुकशुकाट होता.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून ठिय्या अांदोलन सुरू असून या ठिकाणावरून बंदची हाक देण्यात अाली होती. सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चातर्फे शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात अाली. यामध्ये हजारो तरुण, कार्यकर्ते सहभागी झाले होते. मराठा समाजाला अारक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ‘बंद’च्या पार्श्वभूमीवर अकोला शहरात पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने बंद यशस्वी केला.   

सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला बोरगावमंजू येथे पाठिंबा मिळाला. सोपीनाथ महाराज मंदिराजवळ राष्ट्रीय महामार्गावर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून  ‘एक मराठा-लाख मराठा’, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत गजानन देशमुख यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन केले.

बाळापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने पारस फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धनेगाव फाट्यावर टायर जाळून आंदोलकांनी निदर्शने केली. पोलिसांची मोठी दमछाक झाली होती. मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला बाळापूर तालुक्यात वाडेगाव येथील व्यापाऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठ बंद होती. या वेळी बाळापूर तहसीलदार दीपक पुंडे, नायब तहसीलदार योगेश कौटकर परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

वाशीम, बुलडाण्यातही अांदोलन मराठा अारक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. बुलडाणा जिल्ह्यात उंद्री येथे बंद पाळण्यात अाला. सिंदखेडराजा तालुक्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात अाला. वाशीम जिल्ह्यात रिसोड तालुक्यात ठिकठिकाणी अांदोलन झाले. गोवर्धना गावात चार तरुणांनी मोबाईल टॉवरवर चढून लक्षवेधी अांदोलन केले. खडकीसदार येथे नागरिकांनी रस्त्यावर उतरून टायर जाळले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com