agriculture news in marathi,agitation for maratha reservation, varhad, maharashtra | Agrowon

मराठा अारक्षणाच्या मागणीसाठी वऱ्हाडात आंदोलने सुरूच

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 जुलै 2018

अकोला  ः मराठा समाजाला अारक्षण मिळावे, या मागणीसाठी गुरुवारी (ता.२६) अकोला, वाशीम जिल्ह्यातील काही भागात रास्ता रोको आंदोलन करण्यात अाले. वाशीम जिल्ह्यात प्रामुख्याने अांदोलनांचा जोर अधिक होता.

अकोला  ः मराठा समाजाला अारक्षण मिळावे, या मागणीसाठी गुरुवारी (ता.२६) अकोला, वाशीम जिल्ह्यातील काही भागात रास्ता रोको आंदोलन करण्यात अाले. वाशीम जिल्ह्यात प्रामुख्याने अांदोलनांचा जोर अधिक होता.

अकोला जिल्ह्यात बाळापूर  तालुक्यातील बाभूळगाव येथे आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अांदोलकांनी रस्त्यावर ठिय्या देत अारक्षणाची मागणी लावून धरली तसेच शासनाचा निषेध केला. वाशीम जिल्ह्यात मालेगाव, रिसोड, मानोरा, मंगरूळपीर या तालुक्यांत बंद पाळण्यात अाला. शेलुबाजार येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बंद ठेवण्यात आला होता. मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या शेलूबाजार येथे सर्व व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवत आंदोलनास पाठिंबा दिला.

मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे सकाळी शेकडोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. याठिकाणी अांदोलकांनी  टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले. रिसोड तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक ठप्प होती. मोप येथे अांदोलकांनी निवेदन देत अामदारांच्या राजीनाम्याची मागणी केली.  

अांदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतली. त्यांच्या मृत्यूस मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन शिरपूर जैन येथे अांदोलकांनी पोलिसांना दिले. मराठा-कुणबी समाज हा शेती करणारा असून अाज अनेकांना कुटुंबांचे उदरभरण करणेही अडचणीचे झालेले अाहे.  शासनाच्या व्यापार धार्जिण्या धोरणामुळे व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय अडचणीत अाला अाहे. अशा समाजाला अाता अारक्षणाची नितांत गरज अाहे. शासनाने या मुद्याकडे गांभीर्याने लक्ष देत मागणी पूर्ण करावी, असेही निवेदनात म्हटले
अाहे.         

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या   वतीने मालेगाव शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. सकाळी नऊ वाजता सकल मराठा समाजाच्या तरुणांनी शहरातून रॅली काढून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठानेे बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम...मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर....
हृदयविकारामुळे होणारे मृत्यू...मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या...