agriculture news in marathi,agitation for maratha reservation,nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात आंदोलनाची तीव्रता कायम

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 जुलै 2018

नगर  ः मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गुरुवारी (ता.२६) नगर जिल्ह्यातील अनेक भागात बंद पाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे गुरुवारी देखील वाहतुकीवर परिणाम झालेला दिसला. जिल्ह्यातील दक्षिण भागात गुरुवारी आंदोलनाची तीव्रता अधिक होती. कर्जतमध्ये कार्यकर्त्यांनी पंचायत समिती कार्यालयाला कुलूप लावले.

नगर  ः मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गुरुवारी (ता.२६) नगर जिल्ह्यातील अनेक भागात बंद पाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे गुरुवारी देखील वाहतुकीवर परिणाम झालेला दिसला. जिल्ह्यातील दक्षिण भागात गुरुवारी आंदोलनाची तीव्रता अधिक होती. कर्जतमध्ये कार्यकर्त्यांनी पंचायत समिती कार्यालयाला कुलूप लावले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पाच ते सहा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. तीन दिवसांपासून त्याची तीव्रता नगरमध्येही दिसून येत आहे. गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील अनेक भागात आंदोलन झाले. श्रीगोंदा तालुक्‍यातील ढोकराई फाटा, पाथर्डी तालुक्‍यातील मिडसांगवी, कर्जतमधील मिरजगाव, पारनेरमधील निघोज, टाकळी ढोकेश्‍वर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पारनेर तालुक्‍यात कान्हूर पठार, टाकळी ढोकेश्‍वर, पारनेर, सुपा, पिंपळगाव रोठा, निघोज, अळकुटी, जवळा येथे तर कर्जत तालुक्‍यातील माही जळगाव येथे बंद पाळून आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला. कुळधरण भागात गुरुवारीही एसटी सेवा सुरू झाली नाही.

मिरजगाव, चिचोंडी पाटील येथे बंद पाळण्यात आला. गुरुवारी झालेल्या आंदोलनाचा वाहतुकीवर परिणाम झाला. आंदोलनाचा अंदाज घेत आगारातून एसटी गाड्या सोडण्यात येत होत्या. गुरुवारी बंद असलेल्या भागात लोकांनी संताप व्यक्त करत लोकप्रतिनिधींनी राजीनामे देण्याची मागणी केली. गुरुवारी दक्षिण भागातील पारनेर, श्रीगोंदा, पारनेर, भागात आंदोलनाची तीव्रता अधिक होती. कर्जतमध्ये कार्यकर्त्यांनी पंचायत समितीला कुलूप लावले.

दरम्यान, बुधवारी नगर शहरासह जिल्हाभरात झालेल्या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे सरकारवरील रोष अधिकच तीव्र होत असून गुन्हे दाखल करण्याचे षङ्‌यंत्र रचले तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कार्यकर्ते देत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...