पुष्प प्रदर्शनात कृषी महाविद्यालयाची बाजी

पुष्प प्रदर्शनात कृषी महाविद्यालयाची बाजी
पुष्प प्रदर्शनात कृषी महाविद्यालयाची बाजी

नागपूर : फुलांचं निरागस सौदर्य दाखविणाऱ्या वार्षिक पुष्प प्रदर्शनात कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागाने अनेक पुरस्कार आपल्या  नावे केले. विधान भवन परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे आयोजन होते.

फुलं, पुष्प असं कोणत्याही नावानं संबोधल तरी फुलं असतातच लोभस, निरागस. फुलांच्या प्रसन्नतेमुळेच, त्या फुलांच्या गंधकोशी सारखी तलम भावगीत, असो की आणखी यासारखी किती तरी भावकाव्य असो कविता असो किंवा प्रतीमा असो, फुलांचा उल्लेख होणारच, असे म्हटले जाते. अशा या फुलांच सौदर्य पुष्प प्रदर्शनाच्या माध्यमातून अधिकच खुलत. विधानभवन परिसरात आयोजित पुष्प प्रदर्शनाच हे ४६ वे वर्ष होते. याचे उद्‍घाटन मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांच्या हस्ते करण्यात आले.

हंगामी फुले, शोभिवंत व फुलझाडे, लॅंडस्केप, ऑन द स्पॉट व उद्यान स्पर्धा विभागातून ७५० प्रवेशिका आल्या होत्या. तर एकूण ५० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये किंग ऑफ रोझेस हा पुरस्कार मून स्टोन या गुलाबाकरिता श्रीमती मन्सुरा हसन यांना मिळाला. 

श्रीमती दुधळवार, प्रशांत तेलंग यांनाही पुरस्कार देत गौरविण्यात आले. नागपूर कृषी महाविद्यालयाने अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले. सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. एम. पंचभाई, उद्यानविद्या विभागाचे प्रमुख डॉ. आर. पी. गजभीये, प्रवीण भुते, डॉ. हरीश सवाई, डॉ. विनोद राऊत, डॉ. गायकवाड यांनी त्यासाठी प्रयत्न केले.

कृषी महाविद्यालयाची बाजी

अकोला कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या नागपूर कृषी महाविद्यालयाने अनेक पुरस्कार आपल्या नावे केले. त्यामध्ये एक फिरते चषक तसेच दोन पहिल्या क्रमांकाची आणि तीन द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com