agriculture news in Marathi,agriculture commissioner says, 20 lac farmers submit applications for inspection, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

पंचनाम्यासाठी २० लाख विमाधारकांचे अर्जः कृषी आयुक्त
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

पुणे: राज्यात अतिपावसानंतर आत्तापर्यंत २० लाख विमाधारक शेतकऱ्यांनी पंचनामा करण्यासाठी अर्ज केले आहेत, अशी माहिती कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी दिली.  

पुणे: राज्यात अतिपावसानंतर आत्तापर्यंत २० लाख विमाधारक शेतकऱ्यांनी पंचनामा करण्यासाठी अर्ज केले आहेत, अशी माहिती कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी दिली.  

“पावसामुळे ५४ लाख हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मात्र, पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच निश्चित आकडा हाती येईल. सात नोव्हेंबरची अंतिम मुदत देत आम्ही सर्व यंत्रणा पंचनाम्यासाठी कामाला लावली असली तरी सतत पाऊस आणि बांधापर्यंत पोचण्यात अडचणी आहेत. त्यामुळे काम लांबले जाऊ शकते. तरीही कृषी विभागाने इतर कामे बाजूला सारून आमचे सर्व कृषी सहायक, मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी व राज्यातील सर्व यंत्रणा या कामाला जुंपली आहे,” असे आयुक्त म्हणाले.   

वीमा नियमावलीनुसार वैयक्तिक नुकसान झाल्यास इंटिमेशन (सूचित) देण्याची जबाबदारी शेतकऱ्यांकडे असते. आयुक्त म्हणाले की, “आतापर्यंत २० लाख अर्ज आलेले आहेत. अर्ज आल्यानंतर आम्हाला प्रत्यक्ष शेतात जावून अक्षांश-रेखांशच्या नोंदीसहीत छायाचित्र घेत पंचनामा करावा लागतो.

भरपाईसाठी राबविली जाणारी प्रकिया त्याशिवाय पूर्ण होत नाही. इतक्या मोठ्या संख्येने प्रथमच अर्ज आलेले आहेत. ही जबाबदारी ताणतणावाची व चिंता वाढविणारी असली तरी आमची सर्व यंत्रणा दिवसरात्र काम करते आहे.”
राज्यात आतापर्यंत काही भागात ३० ते ७० टक्के पंचनाम्याचे काम झालेले आहे. मुळात अतिपावसामुळे शेतात जाण्यास रस्ते उपलब्ध नाहीत. त्यामुळे पंचनाम्याची कामे जलदपणे करण्यात सर्वच यंत्रणेला अडचणी येत आहेत. सर्वात जास्त नुकसान औरंगाबाद व लातूर भागात झाले आहे, असे निरीक्षण आयुक्तांनी नोंदविले. 

विमा प्रतिनिधी नसला  तरीही पंचनामे ग्राह्य
पिकाचे पंचनामे करताना वीमा कंपनीचा प्रतिनिधी अत्यावश्यक असतो. तथापि, लाखो ठिकाणी पोचणे शक्य नसल्याने विमा प्रतिनिधी नसला तरी कृषी विभागाच्या यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरले जाणार आहेत. कंपन्यांना देखील आम्ही तसे कळवून टाकले आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

धोरणात्मक निर्णय तातडीने शक्य
पाऊस स्थिती, खरिपाचे नुकसान, रब्बीची तयारी याबाबत सरकारी पातळीवरून देखील सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांकडून गेल्या पाच दिवसांत पाच वेळा आढावा घेण्यात आला आहे. मी स्वतः जुन्नर, नाशिक, खेड, आंबेगाव, नगर, संगमनेर, लातूर, बीड भागाचा दौरा केला आहे. कृषी सचिवांनी धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगाव, जालना, नांदेड भागाचा दौरा केलेला आहे. मुख्यमंत्री देखील बांधावर जावून आलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत धोरणात्मक निर्णय तातडीने होतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. 

इतर अॅग्रो विशेष
विमा कंपनीकडे ३५० शेतकऱ्यांचा हप्ता...संग्रामपूर, जि. बुलडाणा ः तालुक्यातील टाकळी पंच...
ढगाळ हवामानामुळे तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर अंशत:...
अनुदान नव्हे; योगदानच वाचवेल शेतीलावातावरण बदल आणि कोसळणाऱ्या पाऊस धारा अथवा कडक...
साखर निर्यातीची सुवर्णसंधीपावसाळी स्थितीमुळे निर्यात न होऊ शकलेल्या साखर...
कापूस लोकायची लाज राखते; पण आमचं काय? यवतमाळ : ‘‘आमच्या कापसापासून तयार कपड्यानं आमी...
कंपोस्ट खते बनविण्याच्या पद्धतीजमिनीचा कस टिकविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा...
एकदम बाजार समित्या बरखास्त करू नका:...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बाजार समित्या...
पावसाने मोसंबीच्या उत्पादनातही संकटाची...औरंगाबाद : लिंबूवर्गीय फळपिकात 'राजा' पीक म्हणून...
आंतरराष्ट्रीय द्राक्ष चर्चासत्र आजपासूनपुणे: राष्ट्रीय द्राक्ष संशोधन (एनआरसीजी)...
राज्यात पीकहानी ७० लाख हेक्टरच्याही...पुणे : केंद्र शासनाला पाठविल्या जाणाऱ्या अहवालात...
राज्यात गारठा वाढला; नगर १२.१ अंशावरपुणे : किमान तापमानात घट होत असल्याने राज्यात...
साखर कारखान्यांसाठी कर्ज परतफेडीचा...नवी दिल्ली ः केंद्र सरकारने साखर कारखान्यांसाठी...
दोडका पिकाने उंचावले अर्थकारणधामणखेल (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील चंद्रकांत...
पेरू विक्रीसाठी प्रसिद्ध पेरणे फाटापुणे जिल्ह्यातील हवेली आणि शिरूर तालुक्यांच्या...
जळगावचे उडीद मार्केट यंदा पोचले...उडीद उत्पादनात खानदेश अग्रेसर आहे. जळगावच्या...
पर्यायाविना निर्णय घातकच! ऑ नलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) अधिक...
नैसर्गिक आपत्तीपासूनचा धडा काही वेदनांमधून सुखद आनंदप्राप्ती होते, तर काही...
किमान तापमानात किंचित वाढपुणे  : राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर...
बाजार समित्यांना सक्षम पर्याय द्याः...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी...
पावसाने संत्र्यात ४० टक्के फळगळ; ४००...नागपूर : राज्याचे मुख्य फळपिकांत महत्त्वाचे स्थान...