पुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची
अॅग्रो विशेष
रसायने, कीडनाशकांचा विवेकपूर्ण वापर करावा ः कृषिमंत्री तोमर
नवी दिल्ली: रसायने आणि कीडनाशकांचा अतिरेकी वापर पीक आणि मानवी आरोग्यासाठी घातक आहे. शेतीपिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी रसायने आणि कीडनाशकांचा विवेकपूर्ण वापर करावा, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले.
नवी दिल्ली: रसायने आणि कीडनाशकांचा अतिरेकी वापर पीक आणि मानवी आरोग्यासाठी घातक आहे. शेतीपिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी रसायने आणि कीडनाशकांचा विवेकपूर्ण वापर करावा, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले.
येथे झालेल्या कृषी रसायने परिषदेत कृषिमंत्री तोमर बोलत होते. या वेळी कृषिमंत्री म्हणाले की, रसयाने आणि कीडनाशकांचा वापर हा विवेकपूर्ण करणे आवश्यक आहे. अतिरेकी वापराने याचा परिणाम पीक आणि मानवी आरोग्यावरही होतो. विवेकपूर्ण वापराने पिकांची उत्पादकता वाढण्यास मदत होते. देशातील १ हजार ४५० लाख शेतकऱ्यांपैकी जवळपास ८६ टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आणि मध्यम क्षेत्रधारक आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञांनी अल्पभूधारक आणि मध्यम शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन कीडनाशकांची निर्मिती करावी.
‘‘शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी मदत व्हावी अशा चांगल्या दर्जाच्या खते आणि कीडनाशकांची निर्मिती करण्यासाठी सरकारने शास्त्रज्ञांना सांगितले आहे. शेतकऱ्यांनी देशातील बदलत्या हवामानानुसार पीक पद्धतीतही बदल करावा,’’ असेही मंत्री तोमर म्हणाले.
कीडनाशक व्यवस्थापन विधेयक आणणार
राज्यातील शेतकऱ्यांनी कीडनाशकांचा वपार मर्यादित, सुरक्षित व योग्य प्रमाणासहित करणे यासाठीच्या मार्गदर्शक सूचना देण्याच्या उद्देशाने कीटनाशके व्यवस्थान विधेयकाच्या आराखड्यावर सरकार काम करत आहे. हे विधेयक अंमलात आणल्यानंतर देशात कीडनाशकांच्या वापर आणि विक्रीवर कडक बंधने घातली जाणार आहे. कीडनाश निर्मात्यांनी निर्बंध असलेले रसायने कीडनाशकांत वापरल्यास मोठ्या दंडाची तरतूद सरकार करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
- 1 of 433
- ››