agriculture news in Marathi,Agriculture minister says, judicious use of pesticides and chemicals, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

रसायने, कीडनाशकांचा विवेकपूर्ण वापर करावा ः कृषिमंत्री तोमर

कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

नवी दिल्ली: रसायने आणि कीडनाशकांचा अतिरेकी वापर पीक आणि मानवी आरोग्यासाठी घातक आहे. शेतीपिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी रसायने आणि कीडनाशकांचा विवेकपूर्ण वापर करावा, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले.  

नवी दिल्ली: रसायने आणि कीडनाशकांचा अतिरेकी वापर पीक आणि मानवी आरोग्यासाठी घातक आहे. शेतीपिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी रसायने आणि कीडनाशकांचा विवेकपूर्ण वापर करावा, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले.  
येथे झालेल्या कृषी रसायने परिषदेत कृषिमंत्री तोमर बोलत होते. या वेळी कृषिमंत्री म्हणाले की, रसयाने आणि कीडनाशकांचा वापर हा विवेकपूर्ण करणे आवश्‍यक आहे. अतिरेकी वापराने याचा परिणाम पीक आणि मानवी आरोग्यावरही होतो. विवेकपूर्ण वापराने पिकांची उत्पादकता वाढण्यास मदत होते. देशातील १ हजार ४५० लाख शेतकऱ्यांपैकी जवळपास ८६ टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आणि मध्यम क्षेत्रधारक आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञांनी अल्पभूधारक आणि मध्यम शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन कीडनाशकांची निर्मिती करावी.
 
‘‘शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी मदत व्हावी अशा चांगल्या दर्जाच्या खते आणि कीडनाशकांची निर्मिती करण्यासाठी सरकारने शास्त्रज्ञांना सांगितले आहे. शेतकऱ्यांनी देशातील बदलत्या हवामानानुसार पीक पद्धतीतही बदल करावा,’’ असेही मंत्री तोमर म्हणाले.

कीडनाशक व्यवस्थापन विधेयक आणणार
राज्यातील शेतकऱ्यांनी कीडनाशकांचा वपार मर्यादित, सुरक्षित व योग्य प्रमाणासहित करणे यासाठीच्या मार्गदर्शक सूचना देण्याच्या उद्देशाने कीटनाशके व्यवस्थान विधेयकाच्या आराखड्यावर सरकार काम करत आहे. हे विधेयक अंमलात आणल्यानंतर देशात कीडनाशकांच्या वापर आणि विक्रीवर कडक बंधने घातली जाणार आहे. कीडनाश निर्मात्यांनी निर्बंध असलेले रसायने कीडनाशकांत वापरल्यास मोठ्या दंडाची तरतूद सरकार करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.


इतर अॅग्रो विशेष
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...
मत्स्यदुष्काळ का जाहीर होत नाही?शासनाचे मत्स्यदुष्काळाबाबतचे धोरण अत्यंत चुकीचे...
धुळे ९.४ अंश; थंडीत हळूहळू वाढपुणे ः आकाश निरभ्र झाल्याने थंडीत हळूहळू वाढ होऊ...
साईप्रवरा शेतकरी कंपनीची उलाढाल पोचली...नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) परिसरातील...
उन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोगकोल्हापूर : राज्यात उन्हाळी नाचणीचे यशस्वी...
बाजारात रानमेवा खातोय भावअकोला ः गुलाबी थंडीची चाहूल लागताच बाजारात विविध...
बोगस कीडनाशकांची विक्री ४००० कोटींवर ! पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट...
शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी ‘...सोलापूर : ठाकरे सरकारकडून किचकट ऑनलाइन...
राज्यातील साखर उत्पादन घटणारपुणे: राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या...
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...
द्राक्षाचे ४० वाण आयात करणार : डॉ. ए....पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
सुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवापुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या...