जळगाव जिल्ह्यात २१८ टॅंकर

जळगाव जिल्ह्यात २१८ टॅंकर
जळगाव जिल्ह्यात २१८ टॅंकर

जळगाव ः जून संपत आला तरी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावलेली नाही. विविध धरणांच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जलसाठे संपत आले आहेत. पिण्यासाठी जिल्ह्यातील विविध धरणांत जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. २१८ टॅंकर सुरू असून, त्यांची संख्याही वाढत आहे. दुसरीकडे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावली जात आहे. यामुळे प्रशासन हतबल झाले आहेत.  जिल्ह्यातील गिरणा, वाघूर, हतनूर धरण व इतर मध्यम प्रकल्पांतील पाण्याने तळ गाठला आहे. अनेक तालुक्‍यांना मृत साठ्यातून पाणीपुरवठा होत आहे. एकाच आशेवर की पाऊस येईल. सध्या जिल्ह्यात २४७ गावांना २१८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ज्या ठिकाणी पाण्याचा स्रोत आहे तो संपणार नाही. मात्र, स्रोतातून पाणी कमी होण्यापूर्वीच पर्यायी स्रोत महसूल विभागाने शोधून ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत. तहसीलदारांनी असे शोध घेतले आहेत. यामुळे सध्या सुरू असलेला स्रोत आटला, तर लागलीच दुसऱ्या स्रोताचा उपयोग करता येणार आहे.  जलसाठ्याची स्थिती (द.ल.घ.मी.मध्ये) दृष्टिक्षेपात    

धरण पाणीसाठा टक्‍केवारी
हतनूर ०.०० ०.००
गिरणा     ४१.७२ ७.९७ 
वाघूर २७.१७ १०.९३ 
अभोरा     १.२९ २१.४३ 
मंगरूळ ०.०० ०.००
सुकी ६.४५ ३९.८५ 
मोर ५६ १९.६४ 
अग्नावती ०.०० ०.००
हिवरा ०.०० ०.००
बहुळा ०.०० ०.००
तोंडापूर ०.०० ०.००
अंजनी ०.०० ०.००
गूळ २.९७ १३.०५ 
भोकरबारी ०.०० ०.००
बोरी ०.०० ०.००

तालुकानिहाय टॅंकर स्थिती दृष्टिक्षेपात 

तालुका गावे टॅंकर
जळगाव १०
जामनेर ४२ ४४ 
धरणगाव  ४ 
एरंडोल 
भुसावळ ७ 
यावल   ०  ०
रावेर   ०  ०
मुक्ताईनगर
बोदवड 
पाचोरा  २९ २३
चाळीसगाव ३९ ३९
भडगाव  १०
अमळनेर ५४ ३६
पारोळा ४३ २९ 
चोपडा  ०  ०
एकूण २४७ २१८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com