हतनूरचे सर्व ३६ दरवाजे उघडले

हतनूरचे सर्व ३६ दरवाजे उघडले
हतनूरचे सर्व ३६ दरवाजे उघडले

जळगाव ः खानदेशात मागील चार-पाच दिवस झालेल्या पावसात नंदुरबार व धुळे जिल्ह्यांतील कमाल लघू व मध्यम प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील तापी नदीवरील हतनूर धरणाचे सर्व ३६ दरवाजे सोमवारी (ता. २९) सकाळी १०.३० वाजता उघडण्यात आले होते.  जळगाव, धुळे व नंदुरबारंध्ये काही प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात पाऊस झाल्याने जलसाठा किंचित वाढला आहे. परंतु जळगाव जिल्ह्यातील गिरणा, वाघूर, मोर, अभोरा, मंगरूळ, सुकी, गूळ या प्रकल्पांचा साठा वाढलेला नाही. जळगाव जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील बोरी, मन्याड, अग्नावती, भोकरबारी, अंजनी, बहुळा, हिवरा हे प्रकल्प कोरडेच आहेत.  तापी नदीचे उगम क्षेत्र असलेल्या मध्य प्रदेशात जोरदार पाऊस झाल्याने या नदीला पूर आला आहे. या नदीवरील हतनूर प्रकल्पात २२ टक्‍क्‍यांवर साठा आहे. त्याचे ३६ दरवाजे रविवारी (ता. २८) उघडण्यात आले. सोमवारी सकाळपर्यंत त्याचे १४ दरवाजे पूर्ण तर २२ दरवाजे एक मीटरने उघडे होते. या नदीवरील धुळे जिल्ह्यातील सुलवाडे बॅरेजचे तीन, नंदुरबारमधील सारंगखेडा बॅरेजचे दोन तर प्रकाशा बॅरेजचे तीन दरवाजे पूर्ण उघडे करण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये फारसा जलसाठा वाढलेला नसला तरी धुळे व नंदुरबारमधील कमाल प्रकल्पांचा साठा वाढू लागला आहे. त्यात नंदुरबारमधील दरा, धुळ्यातील पांझरा, जामखेडी, अनेर, मालनगाव प्रकल्पांतील साठा वाढला आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्‍यातील गूळ व यावलमधील मोर प्रकल्पांतील साठाही मागील आठवड्याच्या तुलनेत किंचित वाढला आहे.  विविध प्रकल्पांमधील साठा (टक्केवारी) ः जळगाव जिल्हा ः गिरणा ७.५२, वाघूर २१.७६, अभोरा ३७.९७, मंगरूळ २१.७, सुकी २६.२०, मोर २४.५७, तोंडापूर १००, गूळ ३०.३३. धुळे ः अनेर १६.४०, सुलवाडे बॅरेज २२.४४, बुराई १.४८, कनोली ०, पांझरा २९.६४, मालनगाव ३१.७६, जामखेडी ३१.२६, करवंद १६.२१, सोनवद ०, अमरावती ५.७. नंदुरबार ः प्रकाशा बॅरेज ४४.७९, सारंगखेडा बॅरेज २९.४१, दरा ८०.०७, रंगावली ३२.४५. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com