महाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध व्यवसायाचा रुळावरून घसरलेला गाडा संकटाच्या खाईतच जात आ
ताज्या घडामोडी
महावितरणवर शेतकऱ्यांची बैलांसह धडक
अमरावती ः साहेब, ही बैलजोडी तुम्हीच ठेवा. तुमच्या निष्काळजीपणामुळे यांचा बळी जात असेल तर आम्ही ही बैलजोडी परत घेऊन जाणार नाही आणि शेतीदेखील करणार नाही, असा इशारा देत शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली.
अमरावती ः साहेब, ही बैलजोडी तुम्हीच ठेवा. तुमच्या निष्काळजीपणामुळे यांचा बळी जात असेल तर आम्ही ही बैलजोडी परत घेऊन जाणार नाही आणि शेतीदेखील करणार नाही, असा इशारा देत शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली.
जिल्ह्यात शेत मशागतीची कामे करताना शेतातील रोहित्राला किंवा खांबाला आधार देण्यासाठी असलेल्या तारेला स्पर्श होत बैल दगावण्याचे प्रकार नजीकच्या काळात घडले आहेत. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शहरात जीवित हानीचे प्रकार देखील घडले. याचा विरोध आणि निषेध म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी बैलजोडीसह महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांसोबत या वेळी निरनिराळे फलक देखील होते. शेतकऱ्यांनी या वेळी महावितरणच्या विरोधात नारेबाजी केली. तब्बल तासभर प्रतीकात्मक आंदोलन करणात आले.
महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्याला बैलजोडी सोपवून शेतकऱ्यांनी परिसरात ठिय्या दिला. मागण्या पूर्ण होईस्तोवर येथून हालणार नसल्याचे देखील शेतकऱ्यांनी ठणकावले. शेतकऱ्यांच्या या पावित्र्यामुळे वातावरण तापल्याने अखेरीस शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक कारवाईचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या जनावरांसाठी शंभर टक्के भरपाई मिळावी, जिल्ह्यातील विस्कळित असलेले महावितरणचे नियोजन सुरळीत करावे, उघडे असलेले रोहित्र त्वरित बंद करावे, शेतात पडून असलेल्या वीज वाहिनीची तत्काळ विल्हेवाट लावावी, वादळामुळे झुकलेले खांब सरळ करावे, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.
- 1 of 583
- ››