agriculture news in Marathi,article regarding importance of ocean sponge | Agrowon

जैविक रसायनाचा स्रोत : समुद्री स्पंज

डॉ. स्वप्नजा मोहिते
गुरुवार, 25 जुलै 2019

स्पंज संशोधकांसाठी एक महत्त्वाचा विषय आहे. याचे कारण त्यातले असंख्य जिवाणू व शैवाल पेशींचे निवासस्थान. आश्रय मिळवण्याच्या बदल्यात हे जिवाणू किंवा शैवाल अनेक जैविक रसायनांची निर्मिती करतात. कॅन्सरपासून ते मधुमेहापर्यंत अनेक रोगांवर ही जैविक रसायने उपयुक्त ठरू शकतात का, याबद्दल संशोधन चालू आहे.

स्पंज संशोधकांसाठी एक महत्त्वाचा विषय आहे. याचे कारण त्यातले असंख्य जिवाणू व शैवाल पेशींचे निवासस्थान. आश्रय मिळवण्याच्या बदल्यात हे जिवाणू किंवा शैवाल अनेक जैविक रसायनांची निर्मिती करतात. कॅन्सरपासून ते मधुमेहापर्यंत अनेक रोगांवर ही जैविक रसायने उपयुक्त ठरू शकतात का, याबद्दल संशोधन चालू आहे.

महाराष्ट्र राज्याला सुमारे ७२० कि.मी.चा समृद्ध किनारा लाभला आहे. महाराष्ट्र जनुक कोषाच्या माध्यमातून समुद्री स्पंजच्या प्रजातींवर संशोधन करण्यासाठी महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील सागरी अपृष्ठवंशीय प्राण्यांची सूची व जैविक पूर्वेक्षण अंतर्गत स्पॉन्जेस व संबंधित सूक्ष्मजीवांचा विशेष अभ्यास मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी येथे डॉ. स्वप्नजा मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.

स्पंजमधील विविधता 

 •    नैसर्गिक स्पंज हा सच्छिद्र शरीर असणारा प्राणी काळ्या रंगापासून ते गुलाबी, निळा, जांभळा, मोरपिशी, हिरवा, पिवळा अशा अनेक रंगात आढळतो. वसाहतीने राहणारा स्पंज खाऱ्या आणि गोड्या पाण्यात आढळतो. गोड्या पाण्यापेक्षा खाऱ्या पाण्यात आढळणाऱ्या स्पंजच्या रंगात आणि आकारातही खूप वैविध्य आढळते. 
 •    या प्राण्याच्या सच्छिद्र शरीर रचनेमुळे तो पाणी गाळून आपले प्लंवगाच्या स्वरूपातील अन्न मिळवतो. त्याच्या शरीराच्या १०० ग्रॅम वाढीसाठी त्याला १०००लिटर पाणी फिल्टर करावे लागते. यासाठी त्याच्या शरीरावर असणारी लाखो छिद्रे पाणी आत घेतात. या छिद्रांभोवती असणाऱ्या खास पेशी या पाण्यातील प्लवंग व खाद्यकण गाळून घेऊन त्यांचे पचन करतात. काही विशिष्ट पेशी प्राणवायू शोषून घेतात व कार्बनडायऑक्साईड वायू पाण्यात सोडून देतात. हे पाणी व उत्सर्जित पदार्थ शरीराच्या वरच्या बाजूला असणाऱ्या मोठ्या छिद्रातून (ऑस्क्युलम) बाहेर टाकले जातात. 
 •    जगभरात स्पंजच्या ५००० पेक्षा अधिक जाती सापडल्याची नोंद आहे. फुटबॉलच्या आकारापासून उंच धुरांड्याच्या आकाराचे, गोल्फ बॉलच्या आकाराचे, भूछत्रांसारखे आणि माणूस ही सहज मावू शकेल अशा प्रचंड आकाराचे हे स्पंज भरती ओहटीच्या क्षेत्रापासून ते खोल समुद्रात, दगडांना किंवा प्रवाळाच्या खडकांना चिकटून वाढताना सापडतात. 
 •    स्पंजेस हे पाणी गाळून घेणारे मेटाझोअन आहे. जे शरीराच्या माध्यमातून एका दिशेने पाण्याचा प्रवाह पंप करण्यासाठी शुंडकपेशीचा (चायनोसाइट्स) एक थर वापरतात. पॉरीफेरा गटातील या स्पंज प्रजातींचा अभ्यास करण्यासाठी त्यांची शरीररचना, पेशीरचना तसेच शरीराला आधार देणाऱ्या स्पिक्युल्स या सुईसारख्या रचनांचा अभ्यास करणे जरूरीचे असते. हेक्साटिनिलेडा किंवा ग्लास स्पंज वगळले तर जेथे संरचना आणि जीवशास्त्र दोन्ही फारच कमी नोंदलेले आहेत, तेथे स्पंजची ओळख पटवणे अवघड जाते. 

संशोधनाची दिशा 
स्पंजेस व समुद्री वनस्पतींमध्ये अनेक मानवोपयोगी रसायने असल्याने या संशोधनाला सुरवात झाली. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या हर्णेपासून ते आंबोळगड किनाऱ्यापर्यंत विविध ठिकाणी स्पंजेस शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. यातून काही निवडक ठिकाणे या संशोधनात्मक कामासाठी निश्चित करण्यात आली. स्पंजेसचा आकार, रंग, आढळ, ठळक वैशिष्ट्ये, त्यांच्या शरीररचनेत महत्त्वाच्या असणाऱ्या स्पिक्युल्स आणि त्यांसोबत आढळणारे सजीव यांचा अभ्यास केला गेला. 

स्पंज सापडण्याचे ठिकाण

 •  महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीवरील खडकाळ किनाऱ्यावर स्पंज आढळतात. या खडकाळ भागात समुद्राच्या लाटेच्या माऱ्याने काही डबकी तसेच खोलगट आकारचे पाणवटे तयार होतात, त्यामध्ये विशेषत: हे स्पंज दिसून येतात. ही खडकाळ डबकी मुळत: समुद्री जल क्षेत्र आहेत, जी अत्यंत वैविध्यपूर्ण आणि अतिशय उत्पादनक्षम असतात. स्पंज, कोरल, सिरीनॉइड, अॅनिमोन्स, आणि समुद्री शैवाल अशा प्रजातींसाठी ही किनारी क्षेत्रे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. 
 •  स्पंज हे अतिशय प्राथमिक स्वरूपाचे मॅटेझोअन्स किंवा बहुपेशीय प्राणी आहेत. खडकाळ किनाऱ्यांपासून ते काहीशा खोल सागरी भागात आढळतात. भरतीचे पाणी जेथे साठून राहाते त्या ‘रॉकपूल्स’मध्ये इतर अनेक वनस्पती व प्राणी प्रजातींसोबत स्पंज आढळतात. यामध्ये प्रवाळ, खेकडे, मासे यांच्याप्रमाणेच पडायना, उल्वा, कॉलरपा, सारगॅसम अशा अनेक शेवाळवर्गीय वनस्पतींचा समावेश होतो. या रॉकपुलमध्ये असंख्य जीवांची एक अन्नसाखळीच अस्तित्वात असते. एकपेशीय सूक्ष्मजीव उदा. डायटम्स, कोपेपोड्स इतर प्राण्यांच्या पिलावस्था यांच्याबरोबरच अनेक बहुपेक्षीय प्राणी या रॉकपुल्समध्ये एक ‘कम्युनिटी’ बनवून राहतात. 
 •  स्पंजेसना स्वत:चे संरक्षण करण्यासाठी काही विशेष शरीररचना नसते. त्यामुळे ते जिवाणू व शैवाल यांना आपल्या सच्छिद्र शरीरात आसरा देतात. हे सजीव जी जैविक रसायने बनवतात, त्याचा स्पंजना जगण्यासाठी उपयोग होतो. ही जैविक रसायने अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असल्याने सध्या त्यांच्या अभ्यासाला महत्त्व प्राप्त झाले आहे. यामध्ये एकूण २० प्रजाती प्रथमच कोकण किनाऱ्यावर आढळल्या आहेत. 

स्पंज : संशोधनाच्या नवीन संधी 

आज हा स्पंज संशोधकांसाठी एक महत्त्वाचा विषय ठरला आहे. याचे कारण त्यातले असंख्य जिवाणू व शैवालपेशींचे निवासस्थान. आश्रय मिळवण्याच्या बदल्यात हे जिवाणू किंवा शैवाल अनेक जैविक रसायनांची (बायोअॅक्टीव कंपाउंड्स) निर्मिती करतात आणि त्यामुळे स्पंजचे इतर भक्षकांकडून किंवा परजीवींपासून रक्षण होते. कॅन्सरपासून ते मधुमेहापर्यंत अनेक रोगांवर ही जैविक रसायने उपयुक्त ठरू शकतात काय, याबद्दल संशोधन सुरू आहे. त्यामुळे स्पंजाला सागरी पर्यावरणातील केमिकल फॅक्टरी म्हणूनच संबोधले जाऊ लागले आहे. या जैविक रसायनांच्या वैविध्यामुळे, न्यूट्रास्युटिकल्स या जैविक रसायनांचे साइड इफेक्ट्स कमी असतात हे सिद्ध झाल्याने सागरी स्पंजेसकडे संशोधकांचे लक्ष रत्नागिरी किनाऱ्याकडे वळले नाही तरच नवल!

रत्नागिरीतील स्पंजचा प्रत्यक्ष अभ्यास 

 •  रत्नागिरीच्या खडकाळ किनाऱ्यावर आढळून आलेले काही स्पंज प्रजाती ः अम्फीमेडॉन व्हर्डीस, अम्फीमेडॉन एरिना, एलिकोरिया क्रॅसा, चालिनीयुला सुडोमोलिब्टा, सिनाच्रिएला ऑस्ट्रिलॅन्सीस, क्लथ्रिया प्रजाती, क्लिोओना प्रजाती, हॅलिक्लोना क्रॅटेरा, हॅलिक्लोना (रेनिरा) ट्युबीफेरा, हेलिक्लोना (रेनिरा) मॅग्लेरिस, हेओर्टीस कॅव्हरनोसस, ईसिनिआ प्रजाती, ऑप्लितोस्पॉन्जीया पेनटाटा, साकोट्रेग्स फोइटेडस, स्पॉन्जीया परट्युसा, स्पॉन्जीया ओब्स्कुरा, झेटोस्पॉन्जीया कार्बोनेरा. 
 •  या प्रजाती रत्नागिरीच्या आरे-वारे, आलावा (मिऱ्या), वायंगणी, वरवडे, उंडी या खडकाळ किनाऱ्यावर आढळल्या. या स्पंजेस व संबंधित सजीवांचा अभ्यास करताना प्रत्येक महिन्याला त्यांचे नुमने गोळा करून त्यांच्यावर समुदाची क्षारता, तापमान, पाण्याचा सामू व इतर रासायनिक तसेच भौतिक घटकांचा होणारा परिणाम जाणून घेण्याचाही प्रयत्न या प्रकल्पांर्गत केला जात आहे. स्पंजेशी वाढ आणि आढळ आणि वावर या घटकांचा परिणाम होत असतो आणि त्यात ऋतूचक्रानुसार बदल घडतो असे या पाच वर्षाच्या निरीक्षणातून सिद्ध झालेले आहे. 
 •    स्पंजेसचे प्रजननही ऋतुंवर अवलंबून असते, यासाठी समुद्रातील जैविक व अजैविक घटकांचा अभ्यास या प्रकल्पाला नवी दिशा देणारा ठरेल. त्याचे पुढचे पाऊल म्हणून नैसर्गिक वातावरणात वाढणाऱ्या काही स्पंजेसच्या प्रजाती, त्यांच्या रॉकपुल्समध्ये असणारे अधिवास प्रयोगशाळेत अॅक्वेरियम टॅकमध्ये निर्माण करून त्यात वाढवण्यात आल्या. या प्रयोगादरम्यान स्पंजेसच्या २ प्रजाती जवळपास २५५ दिवस या कृत्रिम वातावरणात जगवण्यात मत्स्य महाविद्यालयातील संशोधकांना यश मिळाले. आता हाच प्रयोग इतर प्रजातींसाठी राबविला जाणार आहे.                                                                                                             
 •  किनाऱ्यावर सापडलेल्या स्पॉन्जेसच्या १७ पैकी १६ प्रजाती या डेमोस्पॉन्जीया वर्गातील व त्यातील १ प्रजाती ही कॅरिया या वर्गातील आहे. विशेषत: मोठ्या प्रमाणात आढणाऱ्या हॅलिक्लोना (रेनिरा) मॅग्लारिस हा स्पंज हिरव्या शैवाल आणि झूझांथिली प्रजातींचा आढळ असलेल्या खडकाळ क्षेत्रात जास्त प्रमाणात दिसून येतो. त्याचप्रमाणे हॅलिक्लोना क्रेटेरा स्पंजची दुसऱ्या क्रमांकाची विपुल प्रजाती होय. हे स्पंज ब्रिटल स्टार, ओपियोनेरिस एनुलेटाटाशी संबंधित असल्याचे दिसून आले आहे. 
 •    रत्नागिरी येथील खडकाळ किनारी क्षेत्र जैवविविधतेने समृद्ध अशी क्षेत्रे आहेत. फायटोप्लॅग्टनच्या १५ प्रजाती, झुप्लॅग्टनच्या २० प्रजाती, सीवीडच्या १६ प्रजाती, २० कवचधारी प्रजाती, माशांच्या ४ प्रजाती तसेच प्रवाळांच्या काही प्रजाती या स्पॉन्जेससोबत आढळत असल्याचे प्रामुख्याने आढळून आले.

 - बहर महाकाळ, ९४२३८१७४९२ 
(लेखक मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी येथे कार्यरत आहेत.)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रोगाईड
सुधारित पद्धतीने करा हळद काढणीहळद लागवडीच्या पद्धतीनुसार हळद काढणीची पद्धत...
जाणून घ्या बेल वृक्षाचे महत्त्व..डोळ्याचे विकार, ताप, श्वसनमार्गाला सूज येणे आणि...
..अशी करा चुनखडीयुक्त जमिनीची सुधारणा चुनखडीयुक्त जमिनीत आंतरपीक म्हणून द्विदल पिकांचा...
संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणेसंत्रा, मोसंबी फळबागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती,...
लक्षात घ्या चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्मजमिनीत मुक्त चुना वेड्यावाकड्या खड्यांच्या आणि...
सीताफळातील बहार व्यवस्थापनफेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता...
बदलत्या हवामानात कृषी जैवविविधतेचे...संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृषी जैवविविधता आणि अन्न...
उन्हाळी हंगामास सुरुवातमहाराष्ट्रात आठवड्याच्या सुरुवातीस उत्तर...
थकवा, अशक्‍तपणावर शतावरी गुणकारीशतावरी ही औषधी वनस्पती सर्वांनाच सुपरिचित आहे....
ऊर्जेशिवाय शीतकरणाचे तंत्रकोणत्याही ऊर्जेच्या वापराशिवाय शीतकरणाची एक...
हवामान बदलानुसार कडधान्य वाणनिर्मितीची...पीक उत्पादनासाठी पाणी व माती या दोन गोष्टी फार...
सकस, हिरव्या चाऱ्यासाठी बाजरी फायदेशीरहिरव्या चाऱ्यासाठी बाजरी उन्हाळी व खरीप हंगामात...
..या आहेत कसावा पिकाच्या सुधारित जातीकेंद्रीय कंद पिके संशोधन संस्थेने कसावाच्या १९...
तंत्र कोरफड लागवडीचे...कोरफडीची लागवड वर्षभरात केव्हाही करता येते....
अशी तयार करा भाजीपाला रोपवाटिकारोपवाटिका तयार करताना भाजीपाल्याचे शुद्ध आणि...
सीताफळात योग्य परागसिंचन होणे आवश्यकसीताफळाची फळधारणा तापमानावर जास्त अवलंबून...
भाजीपाला पिकाला द्या गरजेनूसार पाणी उन्हाळी हंगामात भेंडी, चवळी, गवार,...
गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी कपाशी फरदड...फरदड कापूस घेण्याचे काही फायदे असले तरी तोट्यांचे...
जनावरांसाठी चारा म्हणून विविध...झाडांचा हिरवा पाला तुलनात्मकदृष्ट्या एकदल चारा...
ऊस पाचटातून वाढवा सेंद्रिय घटकऊस पाचटापासून कंपोस्ट खत तयार करता येते. ऊस तुटून...