agriculture news in Marathi,assistance for cyclone affected farmers , Maharashtra | Agrowon

‘बुलबुल’ प्रभावित शेतकऱ्यांना मदत जाहीर

वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

भुवनेश्‍वर, ओडिशा:  राज्याला बुलबुल चक्रीवादळाचा शेतकरी आणि मच्छीमारांना मोठा फटका बसला. त्यामुळे ओडिशा सरकारने शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी निविष्ठांवर आणि मत्स्योत्पादकांना मस्त्यशेती आणि मत्स्यबीजशेती दुरुस्तीसाठी तर मच्छीमारांना बोटी आणि जाळ्यांचे झालेले नुकसान भरपाईसाठी मदत जाहीर केली आहे. प्रचंड नुकसानीने अडचणीत आलेल्या शेतकरी आणि मच्छीमारांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. 

भुवनेश्‍वर, ओडिशा:  राज्याला बुलबुल चक्रीवादळाचा शेतकरी आणि मच्छीमारांना मोठा फटका बसला. त्यामुळे ओडिशा सरकारने शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी निविष्ठांवर आणि मत्स्योत्पादकांना मस्त्यशेती आणि मत्स्यबीजशेती दुरुस्तीसाठी तर मच्छीमारांना बोटी आणि जाळ्यांचे झालेले नुकसान भरपाईसाठी मदत जाहीर केली आहे. प्रचंड नुकसानीने अडचणीत आलेल्या शेतकरी आणि मच्छीमारांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. 

नुकत्याच आलेल्या बुलबुल चक्रीवादळाचा ओडिशातील जगजितसिंहपूर, केंद्रापाडा, भद्रक, बालासोर, मयूरभंज आणि जजपूर या जिल्ह्यांना जोरदार फटका बसला. या सहा जिल्ह्यांतील जवळपास दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. याचा हजारो शेतकऱ्यांना फटका बसला. हजारो पशुधनाचा मृत्यू झाला असून यात दुभत्या जनावरांचा समावेश लक्षणीय आहे.

चक्रीवादळाचा थेट परिणाम हा मच्छीमारांवर झाला आहे. मच्छीमारांच्या बोटी आणि मासेमारी जाळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मस्त्यशेतीला या जोरदार वादळाचा दणका बसला. पुरामुळे मत्स्य तळे वाहणे, बांध फुटणे, मत्स्यबीज आणि मासे पुरात वाहून जाणे आदी कारणांमुळे मत्स्यशेतीचे मोठे नुकसान झाले.

राज्यातील सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना थेट वादळाचा फटका बसल्याने सरकारने राज्यातील अल्पभूधारक आणि मध्यम शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी निविष्ठांवर अनुदान जाहीर केले आहे. पशुधन दगावलेल्या शेतकऱ्यांनाही मदत दिली जाणार आहे. तर मच्छीमारांना बोटी आणि मासेमारी जाळ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मदत जाहीर केली. मत्स्यशेतीचेही नुकसान झाल्याने मत्स्यशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत जाहीर केली. 

असे आहे निविष्ठा अनुदान

 •   अल्पभूधारक आणि मध्यम शेतकऱ्यांना लाभ
 •   ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसानीचा समावेश 
 •   दुष्काळी किंवा कोरवाहू शेतीसाठी प्रतिहेक्टरी ६ हजार ८०० रुपये
 •   सिंचनाची सुविधा असलेल्या शेतीसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ५०० रुपये
 •   सर्व बारमाही पिकासांठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये
 •   प्रभावित भागातील ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या अल्प कालावधीच्या कर्जाचे रुपांतर मध्यम कालावधीत करणार

मत्स्यशेती,मच्छीमारांसाठी मदत

 •   बोटींच्या अंशतः नुकसानीसाठी ४ हजार १०० रुपये
 •   मासेमारी जाळीच्या अंशतः नुकसानीसाठी २ हजार १०० रुपये
 •   बोटीच्या पूर्ण नुकसानीसाठी ९ हजार ६०० रुपये
 •   मासेमारी जाळींच्या नुकसानीसाठी २ हजार ६०० रुपये
 •   मत्स्यशेतीच्या पुनर्निर्मितीसाठी प्रतिहेक्टरी १२ हजार २०० रुपये
 •   नुकसानग्रस्त मत्स्यबीज शेतीच्या निविष्ठा अनुदानासाठी प्रतिहेक्टरी ८ हजार  २०० रुपये 

प्रत्येकी पशुधनासाठी मदत पुढीलप्रमाणे (कंसात पशुधन मर्यादा)
३० हजार
दुधाळ गायी, म्हशी

२५ हजार
भाकड जनावरे (तीनपर्यंत)

१६ हजार
वासरे

३ हजार 
शेळ्या, मेंढ्या (३० पर्यंत)

५० रुपये (प्रती पक्षी)
पोल्ट्री (५० हजारांपर्यंत)


इतर ताज्या घडामोडी
मधमाशीला हानिकारक कीटकनाशके टाळा : आर....‌अंबाजोगाई : ‘‘शेतकऱ्यांनी मधमाश्यांच्या जाती...
परभणी जिल्ह्यात साडेसहा हजारांवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात...
सोलापूर : कांदा लिलाव बंद पाडण्याचा डाव...सोलापूर : सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या काही...
कोल्हापूर : शेती, घरांच्या नुकसानीसाठी...कोल्हापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि...
विज्ञान, अध्यात्माच्या ताकदीने देश विश्...कुंडल, जि. सांगली :  ज्ञान, विज्ञान, संगणक व...
संत्र्याचे विपणनाचे जाळे विणण्याची गरज...अमरावती  ः सांघिक तत्त्वावर संत्रा...
फडणवीसांविरोधात पक्षांतर्गत नाराजांची...मुंबई ः भाजपवर विरोधी पक्षात बसण्याची नामुष्की...
कृषी पदवीधर तरूणांनी समाजासाठी काम...नगर : ‘‘देशात प्रामाणिकपणे काम केलेले अनेक शेतकरी...
फडणवीस सरकारची ३१० कोटींची हमी रद्द...मुंबई ः शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र...
आचारसंहितेपूर्वीच्या निर्णयांची...मुंबई ः विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू...
पुणे जिल्ह्यात भातकाढणी अंतिम टप्प्यातपुणे ः पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी...
पश्‍चिम महाराष्ट्रात...पुणे ः पश्‍चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि...
सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना...कऱ्हाड, जि. सातारा ः राजकीय पक्षांचा आदर्श घेऊन...
नगर जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामावर सात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये आता रोजगार हमी योजनेच्या...
चंद्रशेखर भडसावळे यांना मार्टचा ‘फादर...खडकवासला, जि. पुणे : कृषी पर्यटन संकल्पनेचे...
देशी कापूस संशोधन केंद्राचा उद्या...परभणी: वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या...
गांडूळखत अर्क निर्मितीसेंद्रिय शेतीमध्ये गांडुळे व गाडूळखताचे मोठे...
राज्यात काकडीला ५०० ते २००० रुपये दरअकोला येथील बाजारात गुरुवारी (ता. ५) काकडीची...
मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरचमुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २१...
केंद्राने कांदा साठवणूक मर्यादा ५०...नाशिक : गेल्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस...