Agriculture news in marathi;At Bandar, Kandhargaon, the dam built by the bridge | Agrowon

काथरगाव येथे पुलाला लागून बांधलेला बंधारा तुडुंब
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 जुलै 2019

संग्रामपूर जि. बुलडाणा ः खारपाणपट्ट्यात मोडणाऱ्या काथरगाव येथे गावकऱ्यांच्या सुविधेसाठी बांधलेल्या पुलावर बंधारा उभारण्यात आल्याने जलसंधारणाचे मोठे कामही झाली आहे. या तालुक्यात आत्तापर्यंत झालेल्या पावसाच्या पाण्याने हा बंधारा तुडुंब भरला असून सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. पांडव नदीच्या पहिल्याच पुराच्या पाण्याने या बंधाऱ्यात कोट्यवधी लीटर पाणी साचले आहे.

संग्रामपूर जि. बुलडाणा ः खारपाणपट्ट्यात मोडणाऱ्या काथरगाव येथे गावकऱ्यांच्या सुविधेसाठी बांधलेल्या पुलावर बंधारा उभारण्यात आल्याने जलसंधारणाचे मोठे कामही झाली आहे. या तालुक्यात आत्तापर्यंत झालेल्या पावसाच्या पाण्याने हा बंधारा तुडुंब भरला असून सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. पांडव नदीच्या पहिल्याच पुराच्या पाण्याने या बंधाऱ्यात कोट्यवधी लीटर पाणी साचले आहे.

वरवट बकाल ते शेगाव मार्गावर पश्चिमेकडे काथरगाव हे छोट्याशा लोकवस्तीचे गाव आहे. या गावात जाण्यासाठी पांडव नदी ओलांडून प्रवेश करावा लागतो. ही नदी सातपुडा पर्वतातून वाहणारी असल्याने पावसाळ्यात दरवर्षी मोठे पूर येतात. जेव्हा पूर यायचा त्या वेळी गावाचा संपर्क तुटायचा. या गावाची ही मोठी समस्या लक्षात घेत या भागाचे आमदार तथा विद्यमान कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांनी शासनाकडून वेगळ्या डिझाइनचा आणि दुहेरी लाभाचा हा पहिला पूल बंधाऱ्यासह या गावात निर्मितीसाठी निधी उपलब्ध करून घेतला. यंदा पहिल्याच पावसाळ्यात यात साचलेले पाणी पाहून गावकरी आनंदीत झाले आहेत. पुलासह असा बंधारा अद्याप या भागात नव्हे तर जिल्ह्यातही दिसून येत नाही. हा बंधारा पुलाला जोडल्याने शासनाचा निधी वाचवण्यात यश आले आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त सचिव पी. एन. बोंगीरवार यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग साकारण्यात आला आहे. ६ मीटरचे पाच गाळे, लांबी ३० मीटर, २ मीटर उंची असा हा पूल आणि बंधारा जळगाव जामोद सार्वजनिक बांधकाम विभागाने एक महिन्याच्या कालावधीत पूर्णत्वास नेला. या तालुक्यातून पूर्णा, वाण, लेंडी, पांडव, बन, बेंबळा अशा महत्त्वाच्या अनेक मोठ्या नद्या वाहतात. या नद्यांचा उगम उत्तरेस सातपुडा पर्वतातून आहे. या नद्या दक्षिणेकडे वाहत जात पूर्णा नदीला मिळतात. सोबतच नाले ही भरपूर आहेत. या नद्यांवर ठिकठिकाणी असे बंधारे उभारण्याची गरज आता समोर येत आहे.

इतर ताज्या घडामोडी
मेहकर तालुक्यात कृषी कर्मचाऱ्यांनी...अकोला ः मेहकर तालुक्यात यावर्षी समाधानकारक...
खामगावात टेक्सटाइल पार्क होणारच ः...बुलडाणा  ः तरुणांना रोजगार उपलब्ध करून...
खारपाण पट्ट्यात रब्बीत हजार हेक्टरवर...अकोला  ः जिल्ह्यात असलेल्या खारपाण पट्ट्यात...
जळगाव जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रांत...जळगाव  ः जिल्ह्यात शासकीय हमीभाव कडधान्य व...
वाघाच्या दहशतीखालील गावे टाकणार...वर्धा  ः कारंजा घाडगे तालुक्‍यातील अनेक...
वीजग्राहकांच्या समस्यांबाबत भूमिका...मुंबई ः राज्यातील महावितरण कंपनीच्या...
सोलापुरातील ६९५ दूध संस्थांना नोटिसासोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाला दूध...
एचएएल कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी बेमुदत...नाशिक  : प्रलंबित वेतन करारासह इतर...
आटपाडी तालुका पाऊस, ‘टेंभू’मुळे पाणीदारसांगली : आटपाडी तालुक्यात टेंभूच्या योजनेचे...
सांगलीतील निवडणूक प्रचारात शेती प्रश्‍न...सांगली: विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगू...
हजारो नाशिककरांनी चाखली रानभाज्यांची चवनाशिक : आदिवासी भागात उपलब्ध होणाऱ्या विषमुक्त...
`मी काय केले, हे विचारणाऱ्या अमित...कन्नड जि. औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी व...
जालन्यात मूग खरेदी केंद्रांकडे...जालना : हमीदराने शेतीमाल खरेदीसाठी जिल्ह्यात...
नवरात्रोत्सवात पुणे बाजारसमितीत फुलांची...पुणे  ः नवरात्र आणि दसऱ्याला पुणे बाजार...
वैविध्यपूर्ण विचारांनी विद्यार्थी...परभणी : ‘‘विद्यार्थ्‍यांची सांस्‍कृतिक, भाषिक व...
झेंडू उत्पादक प्रतिकूल हवामानामुळे...ढेबेवाडी, जि. सातारा   : पावसाळी हवामान...
नगर : शेतकऱ्यांना लष्करी अळीचा...नगर  ः खरिपात लष्करी अळीमुळे ७० टक्के...
सरकारची दादागिरी थांबवण्याची वेळ आली...नगर  : सरकार ‘ईडी’ आणि इतर संस्थांच्या...
शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्यासाठी मूलभूत...वणी, जि. यवतमाळ   ः सिंचन सुविधात वाढ...
भाजप, शिवसेना जनतेला फसवतेय ः अशोक...भोकर, जि. नांदेड   ः भाजप आणि शिवसेनेची...