जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या ५७.८ टक्के पाऊस

जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या ५७.८ टक्के पाऊस
जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या ५७.८ टक्के पाऊस

जळगाव : जिल्ह्यात या आठवड्यात झालेल्या पर्जन्यमानाने वार्षिक सरासरी पर्जन्यमानात मोठी वाढ झाली आहे. २१ ऑगस्टपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मागील दोन दिवस अपवाद वगळता कुठेही पाऊस झालेला नाही. गुरुवारअखेर (ता.२३) वार्षिक सरासरीच्या ५७.८ टक्के इतका पाऊस पडला आहे.

जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६६३.३ मिलिमीटर इतके आहे. मागील वर्षी २१ ऑगस्ट, २०१७ पर्यंत वार्षिक सरासरीच्या फक्त ४८.५ टक्के म्हणजेच ३२०.९ मिलिमीटर इतका पाऊस पडला होता. तर यावर्षी ३८३.६ मिलिमीटर म्हणजेच मागील वर्षीपेक्षा ६३ मिलिमीटर इतका पाऊस अधिक पडला आहे. वार्षिक सरासरीचा विचार केल्यास आजपर्यंत सर्वाधिक ७५.५ टक्के इतका पाऊस एरंडोल तालुक्‍यात पडला असून, सर्वांत कमी म्हणजेच ४५.५ टक्के पाऊस भुसावळ तालुक्‍यात पडला आहे. जिल्ह्यात दिवसभर सुरू असलेल्या संततधारेमुळे  मंगळवारी (ता.२१) एका दिवसात ३६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये १४.१८ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. हतनूर प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले असून, पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प आहेत. अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गूळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे तेरा मध्यम,  तर ९६ लघू प्रकल्प आहेत. त्यांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा १४२७.५१ दलघमी म्हणजेच ५०.४० टीएमसी इतका आहे.

मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील पाऊस (मिलिमीटरमध्ये) आणि वार्षिक सरासरीशी टक्केवारी (कंसात) ः

जळगाव तालुका - ३७८.९ (५५.१ टक्के), जामनेर- ३७०.४, (५१.३), एरंडोल- ४७०.७ (७५.५), धरणगाव - ४६७.६ (७५.००), भुसावळ - ३०४.६ (४५.५), यावल - ३३०.१ (४७.३), रावेर - ३८०.३ (५६.९), मुक्ताईनगर - ३१३.६ (५०.१), बोदवड - ४०८.६ (६१.१), पाचोरा - ४२८.२ (५७.६), चाळीसगाव - ३९१.७ (५९.३), भडगाव - ३६९.४ (५५.१) अंमळनेर - ३०६.८ (५२.७), पारोळा - ४४६.९ (७२.५), चोपडा - ३८६.५ (५५.९)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com