पावसानं बाजरीची माती झाली, खायचे झाले वांधे!

बाजरी पीक नुकसान
बाजरी पीक नुकसान

नजीक बाभूळगाव, जि. नगर ः ‘‘आमच्या भागात बाजरीचे पारंपरिक पीक. अनेक पिढ्यांपासून बाजरी होते. यंदा मात्र पावसाने बाजरीला मातीमोल केलंय. बाजरी काढायला सरू केली अन् पाऊस सुरू झाला. पंधरा दिवस सतत पडणाऱ्या पावसाने काढलेल्या बाजरीची माती केली. दर वर्षी चाळीस पोते घरात यायचे. यंदा पोतंभरही बाजरी नाही. साऱ्या बाजरीची माती झाली, आता खायचेच वांधे झाले. नुकसान झाले, पण अजून कृषी विभागासह कोणत्याही विभागाचे अधिकारी फिरकले नाहीत,’’ नजिक बाभूळगाव (ता. शेवगाव) चे सोमनाथ घनवट, देविलाल घनवट हतबल होऊन बाजरीच्या झालेल्या नुकसानीची व्यथा मांडत होते.  कोरडवाहू पीक म्हणून ओळख असलेल्या खरीप बाजरीचे पीक प्रामुख्याने राज्यात सिंचनाचा अभाव असलेल्या भागात घेतले जाते. यंदा राज्यात सुरवातीच्या काळात पुरेसा पाऊस झाला नाही आणि नंतरच्या काळातही पावसाने ओढ दिल्याने बाजरीची सरासरी क्षेत्राच्या ७८ टक्के म्हणजे ८ लाख १० हजार ४६७ क्षेत्रापैकी ६ लाख ३३ हजार ९२२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली.  “शासनाकडे आधी ५४ लाख हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल व कृषी विभागाने दिला होता. त्यात जास्तीत जास्त १० ते २० लाखाची वाढ अपेक्षित होती. मात्र, पंचनामे वेळेत होत नसल्याने निश्चित नुकसान कळत नव्हते. त्यामुळे केंद्रालादेखील नुकसान भरपाईचा अहवाल पाठविता येत नव्हता. अर्थात, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होताच पंचनाम्याच्या नेहमीच्या ‘आस्ते कदम’ परंपरेवर गदा आली. त्यात पुन्हा राज्यपालांपर्यंत पंचनाम्याचा गोंधळ पोचला. राज्यपाल स्वतः पंचनाम्याचा आढावा घेणार असल्याचे शुक्रवारी (ता. १४) राज्यभर कळताच महसूल विभागाची त्रेधातिरपीट झाली,” अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. राज्यपाल स्वतः प्रत्येक जिल्ह्याचा आढावा शनिवारी सकाळी घेणार असल्याने तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांची धावपळ झाली. कारण, जिल्हाधिकाऱ्यांकडून सुस्त यंत्रणेला शुक्रवारी चांगलेच फैलावर घेतले गेले. यामुळे अधिकाऱ्यांच्या झोपा उडाल्या. अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रभर ‘पीक पंचनाम्या’चे काम सुरू होते. राज्यपालांच्या बैठकीचा इतका धसका सरकारी यंत्रणेने घेतला की आकड्यांचा पाऊस पडला.! “राज्यपालांचा धसका घेतल्याने भेदरलेल्या यंत्रणेने पंचनाम्याची १०० टक्के कामे पूर्ण केली आहेत. यात नुकसानीचा आकडा चक्क ९३ लाख हेक्टरच्या पुढे गेल्याने आम्हीदेखील चक्रावून गेलो आहोत. एक कोटी ४ लाख शेतकऱ्यांचे पंचनामे झाल्याचे महसूल विभागाने कळविले आहे. राज्याच्या नैसर्गिक आपत्ती मदतीच्या वाटचालीत हा आकडा ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे,” अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाच्या सूत्रांनी दिली. दृष्टिक्षेपात बाजरी

  • राज्यात ८ लाख १० हजार ४६७ सरासरी क्षेत्रापैकी यंदा ६ लाख ३३ हजार ९२२ हेक्टरवर म्हणजे ७८.०२ टक्के पेरणी. 
  • राज्यात सुमारे पाच लाख सात हेक्टर क्षेत्रावरील कणसाला जागेवर फुटले कोंब 
  • दहा हजार टन बाजरीच्या धान्याची झाली माती 
  • आजच्या बाजाराभावानुसार एक हजार आठशे कोटींचा फटका 
  • एक हजार दोनशे साठ टन चाऱ्याचीही नासाडी  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com