agriculture news in marathi,balasaheb thorat selected as a leader of the legislature, mumbai, maharashtra | Agrowon

काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी बाळासाहेब थोरात
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 जून 2019

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने विधिमंडळ पक्षात फेरबदल केले आहेत. विधिमंडळ पक्षनेतेपदी नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. तर विधानसभेच्या गटनेतेपदी विदर्भातील आमदार विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती केली आहे. पक्षात नाराज असलेल्या आमदारांची प्रतोदपदी वर्णी लावून त्यांना खूश करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने विधिमंडळ पक्षात फेरबदल केले आहेत. विधिमंडळ पक्षनेतेपदी नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. तर विधानसभेच्या गटनेतेपदी विदर्भातील आमदार विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती केली आहे. पक्षात नाराज असलेल्या आमदारांची प्रतोदपदी वर्णी लावून त्यांना खूश करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर विखे-पाटील यांनी पक्षालाही सोडचिठ्ठी दिली. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी नव्या नियुक्त्यांबाबत माहिती दिली. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी यासंदर्भातील पत्र खरगे यांना दिले. नगर जिल्ह्यातील विखे-पाटील यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या बाळासाहेब थोरात यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करुन विखे-पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. पूर्व विदर्भातील चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांना गटनेता म्हणून बढती देण्यात आली आहे. वडेट्टीवार हे याआधी उपनेते म्हणून काम करत होते.

विधिमंडळ पक्षाचे उपनेते म्हणून मुंबईतील नसीम खान यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी लातूर जिल्ह्यातील आमदार बसवराज पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. तर प्रतोद म्हणून के. सी. पाडवी, सुनील केदार, जयकुमार गोरे, यशोमती ठाकूर आणि प्रणिती शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. पदे मिळालेल्या आमदारांपैकी सुनील केदार आणि जयकुमार गोरे हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. काँग्रेसने या नाराज आमदारांना पद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

विधान परिषदेच्या गटनेतेपदी शरद रणपिसे यांची नेमणूक करण्यात आली आहे. उपनेते म्हणून रामहरी रूपनवर यांची नियुक्ती झाली आहे. भाई जगताप हे विधान परिषदेत काँग्रेसचे प्रतोद राहणार आहेत.

इतर ताज्या घडामोडी
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...