agriculture news in marathi,balasaheb thorat targets state government, nagar, maharashtra | Agrowon

दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना राबवण्यात सरकार अपयशी : बाळासाहेब थोरात
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 मे 2019

नगर  : पावसाने दडी मारल्याने राज्यात दुष्काळ आहे. रोजगार हमी, पाणीपुरवठा, चारा छावण्यांबाबत उपाययोजना राबविण्यात सरकार अपयशी ठरले आहे. विशेषत: रोजगार हमी योजनेच्या कामांना मंजुरी असतानाही कामे झालेली नाहीत. आचारसंहितेचा बाऊ करून अधिकाऱ्यांनी केवळ आनंद लुटला, अशी टीका माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. 

नगर  : पावसाने दडी मारल्याने राज्यात दुष्काळ आहे. रोजगार हमी, पाणीपुरवठा, चारा छावण्यांबाबत उपाययोजना राबविण्यात सरकार अपयशी ठरले आहे. विशेषत: रोजगार हमी योजनेच्या कामांना मंजुरी असतानाही कामे झालेली नाहीत. आचारसंहितेचा बाऊ करून अधिकाऱ्यांनी केवळ आनंद लुटला, अशी टीका माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. 

नगर येथे सोमवारी (ता.१३) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. थोरात बोलत होते. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव विनायक देशमुख, संपत म्हस्के, राजेंद्र नागवडे आदी उपस्थित होते. श्री. थोरात म्हणाले, की निमगाव घाणा, दशमीगव्हाण, चिंचोडी पाटील येथील छावण्यांना भेट देऊन पाहणी केली. निमगावातील छावणीत ७० जनावरे नव्याने दाखल होऊनही अद्याप नोंद केली गेलेली नाही. दर आठ दिवसांनी प्रशासनाने नेमलेल्या पथकांद्वारे छापा घातला जातो. आता नव्यानेच टॅगिंग, बारकोड, स्कॅनिंग करण्याचा आदेश काढला आहे. अटी, शर्तीचे गुऱ्हाळ करून छावणीचालकांना जेरीस आणले जात आहे. सरकारचा शेतकऱ्यांवर अविश्‍वास का, असा प्रश्‍न उपस्थित होतो.

चाऱ्याचे भाव तिप्पट वाढले आहेत. सरकारने अनुदानात वाढ केली पाहिजे. सरकार याबाबत मात्र उदासीन आहे. दुष्काळ उपाययोजनांची सरकारला जाण राहिलेली नाही. दुष्काळी स्थितीतही छावणीचालक उधारी करून छावणी चालवत आहेत. त्यामुळे प्रशासनाची चालकांबाबत सहकार्याची भूमिका असणे गरजेचे आहे. चारा छावण्या सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी होत आला. छावणी चालवण्यासाठीचा खर्च मोठा आहे; परंतु अद्याप एक रुपयाही छावणीचालकांच्या खात्यावर जमा झालेला नाही. यावरून राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असल्याचे स्पष्ट दिसते, असे आमदार थोरात म्हणाले. 

देशमुख म्हणाले, की राज्यात बीड, औरंगाबाद, त्यानंतर नगर येथे सर्वांत जास्त टॅंकर सुरू आहेत. राज्य सरकार जलयुक्त शिवार अभियानाची मोठ्या प्रमाणावर कामे झाली, असा दावा करते. मग नगर जिल्ह्यात इतक्‍या मोठ्या प्रमाणावर टंचाई का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

इतर ताज्या घडामोडी
सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या...अकोला  ः शेगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्य...
सातारा जिल्ह्यातील चार साखर...सातारा  : गाळप हंगामातील ऊस उत्पादकांची...
‘आदिनाथ'च्या कामगारांचे पगारासाठी ‘...सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्याकडून ४१ महिने...
उजनी कालवा फुटला, पिके उद्‌ध्वस्तमोहोळ, जि. सोलापूर : उजनी धरणाचा डावा कालवा मोहोळ...
आधुनिक तंत्रांचा वापर करून स्मार्ट शेती...अकोला : ऊतिसंवर्धित हळद रोपांची निर्मिती आणि...
सांगली जिल्ह्यात अजूनही ९१ टॅंकर सुरूचसांगली  ः जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच...
सिंधुदुर्गातील वृद्ध दाम्पत्यावर...सिंधुदुर्ग  ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी...
पुणे जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदानपुणे : ‘‘विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शहरी...
अखेर बगाजी सागर ‘ओव्हर फ्लो’धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : अमरावती आणि...
'स्मार्ट' मुख्यालयाला मिळाली नवी जागापुणे :  राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाच्या...
सोलापूर जिल्ह्यात मका लष्करी अळीने केला...सोलापूर ः दुष्काळातही जेमतेम पाण्यावर यंदा...
तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पुणे ः उत्तर, दक्षिण महाराष्ट्रात कमी दाबाचे...
अकोला जिल्ह्यात तीन तालुक्यांत अतिवृष्टीअकोला ः मागील २४ तासांत अकोला जिल्ह्यात दमदार...
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...
कर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक  : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...
औरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...
`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...
सांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...