agriculture news in marathi,banana crop damage due to rain and wind, akola, maharashtra | Agrowon

अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी पावसाचा तडाखा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 24 जून 2019

मी सहा हजार केळी रोपांची लागवड केली होती. आधी उष्णतेमुळे केळीचे मोठे नुकसान झाले होते. त्यातून वाचलेली बाग शनिवारी झालेल्या वादळात १०० टक्के उद्ध्वस्त झाली आहे. 
-विकास देशमुख, केळी उत्पादक, पणज, जि. अकोला

अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त असलेल्या केळी उत्पादकांना शनिवारी (ता. २२) रात्री झालेल्या वादळ व पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. अकोट तालुक्यातील विविध गावांतील केळी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. रविवारी (ता. २३) अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे याबाबत ई- मेलद्वारे माहिती कळविली आहे.

थंडी, उष्णतामान आणि पाणी कमी झाल्याने केळीच्या बागांचे आधीच ५० टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांनी बागा कापून टाकल्या आहेत. ज्या बागा शिल्लक होत्या त्यातील झाडे कमकुवत झाली होती. शनिवारी रात्री सहा ते आठ या वेळेत अचानक वादळासह पाऊस झाला. यात केळी बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. केळीची झाडे जमीनदोस्त झाली. पाने फाटून गेली. घडांचेही नुकसान झाले. या आपत्तीमुळे पणज महसूल मंडळातील केळी उत्पादकांचे किमान दोन कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

पणज, अकोली, रूईखेड, गौलखेड, शहापूर, बोचरा, धामणगाव, महागाव, राजूरा, अंबोडा अशा विविध गावांत केळीचे पीक सर्वाधिक घेतले जाते. मागील वर्षभरापासून हे केळी उत्पादक विविध समस्यांनी त्रस्त आहेत. आधी थंडीमुळे बागांचे नुकसान झाले. त्यातून सावरत नाही तर उन्हाचा जोरदार तडाखा या बागांना बसला. सोबतच अनेक शेतकऱ्यांकडील पाणी आटल्याने उभ्या बागा वाळल्या. यात ज्यांच्या बागा सुस्थितीत राहिल्या त्या शेतकऱ्यांना आता शनिवारच्या वादळाने मोठा फटका दिला.

या केळी उत्पादकांनी विमा काढलेला असून नुकसानभरपाईच्या अपेक्षेने रविवारी शेकडो शेतकऱ्यांनी ई-मेलद्वारे विमा कंपनीला याबाबत माहिती दिली आहे. प्रशासनाकडून तातडीने पंचनामा करण्याची मागणीसुद्धा या शेतकऱ्यांकडून केली जात आहे. या भागातील १२ ते १५ गावांत केळीचे नुकसान झालेले आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...
पक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...
पुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...
‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...
जनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...
अमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही...
समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती  : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...
वनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
लाल कांद्याची लागवड वाढण्याची शक्‍यताजळगाव ः खानदेशात आगाप कांदा लागवडीसंबंधी...
पाटण तालुक्यात भातलागणीस वेगपाटण, जि. सातारा ः तालुक्‍यात मॉन्सूनने २७...
नगर झेडपी घेणार साडेसात हजार हेक्‍टरवर...नगर ः चाराटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा...
मराठवाड्यात ‘महारेशीम’साठी १० हजारांवर...औरंगाबाद :  शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्पन्नाचा...
नाशिक जिल्ह्यात पाण्यासह चाऱ्याचा प्रश्...नाशिक  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाचे...
सांगली जिल्ह्यातील ५२ प्रकल्प कोरडेसांगली : पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरीही...