खानदेशात केळी लागवड सुरूच

खानदेशात केळी लागवड सुरूच
खानदेशात केळी लागवड सुरूच

जळगाव ः खानदेशात मृग बहार केळी लागवड अनेक भागात सुरूच आहे. तापी नदीकाठी मुक्ताईनगर, रावेर, यावल भागात ही लागवड आटोपली आहे. जळगाव जिल्ह्यात क्षेत्र स्थिरावेल, अशी स्थिती आहे. नंदुरबारात क्षेत्र काहीसे वाढू शकते, असे सांगितले जात आहे.  जळगाव जिल्ह्यात मृग बहारातील लागवड रावेरात सुमारे १६ ते १८ हजार हेक्‍टरवर केली जाते. या वेळेस ही लागवड स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. मुक्ताईनगरात सुमारे चार हजार हेक्‍टरवर लागवड झाल्याचा अंदाज आहे. तर यावलमध्येही सुमारे साडेतीन हजार हेक्‍टरवर केळी लागवड झाली असून, या तालुक्‍यात क्षेत्र सुमारे ७०० ते ८०० हेक्‍टरने कमी झाले आहे. अद्याप अंतिम आकडेवारी समोर आलेली नाही. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव व जामनेर भागातही मृग बहारातील लागवड सुरू आहे. अनेक शेतकरी या भागात कंद लागवडीला पसंती देत आहेत.  तापीकाठावरील मुक्ताईनगर, यावल, रावेरात लागवड आटोपली असून, या भागात उतिसंवर्धित रोपांना अनेक शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. अतिउष्णतेमुळे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही केळी लागवड रखडली होती. जूनच्या अखेरच्या आठवड्यात मात्र लागवड जोमात सुरू झाली. पाचोरा, जामनेर, भडगावात मिळून पाच ते सहा हजार हेक्‍टरवर केळी लागवड होईल, असा अंदाज आहे. जळगाव, चोपडा या तालुक्‍यांमध्ये कांदेबाग केळी अधिक असते. मृग बहारातील केळी लागवड अपवादाने झाली आहे. कांदेबाग केळी लागवड सप्टेंबरच्या अखेरीस सुरू होईल, असे सांगण्यात आले.  नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, अक्कलकुवा, शहादा या तालुक्‍यांमध्ये मिळून पाच हजार हेक्‍टरवर केळी लागवड अपेक्षित आहे. तळोदा, शहादा येथे लागवड सुरू आहे. तळोदामधील मोड, आमलाड, बोरद, प्रतापपूर भागात, तर शहादामधील खेडदिगर, ब्राह्मणपुरी, जवखेडा, सुलतानपूर व परिसरात लागवड सुरू आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com