agriculture news in Marathi,belt of red Onion in danger due to heavy rain, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

अतिपावसामुळे लाल कांद्याचे आगार धोक्यात

मुकुंद पिंगळे
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

अतिपावसमुळे लागवडी विरळ झाल्या आहेत. काढणीस आलेले पिकांची सड होत आहे. रोगांचे प्रमाण जास्त आहे. काळा करपा आणि जांभळा करपा, मूळ कुज, कंद सड यासारखा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. रोपांची मर होत आहे. रोपे पिवळी पडून झड होत आहे. यामुळे कांदा पिकांच्या नुकसानीची पातळी वाढली आहे.
- डॉ. सतीश भोंडे, कांदा शास्त्रज्ञ व माजी अतिरिक्त संचालक, एनएचआरडीएफ , नाशिक

नाशिक : राज्यातील कांदा उत्पादनाचे मुख्य आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कांदा पिकाला मॉन्सूनोत्तर पावसाचा मोठा फटका बसला असून, कांदा आगारच धोक्यात आले आहे. जिल्ह्यात ५३ हजार ६७२ हेक्टर क्षेत्रावर झालेल्या लागवडीपैकी तब्बल १७ हजार ६५८ हेक्टर क्षेत्राला फटका बसल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने सादर केला आहे. मात्र, निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाल्याचे शेतकरी आणि अभ्यासकांचे मत आहे. 

 चांदवड, येवला, सिन्नर, निफाड तसेच ''कसमादे'' पट्टयातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा भागांतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिवाळीपर्यंत ५३ हजार ६७२ हेक्टर क्षेत्रावर खरीप कांद्याच्या लागवडी केल्या आहेत. ज्यामध्ये खरीप कांद्याची लागवड २२ हजार ७९९ हेक्टर क्षेत्रावर तर लेट खरीप कांद्याची लागवड ३० हजार ८७३ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे.

मात्र, ऑक्टोबरच्या अखेरीस झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाचा १७ हजार ६५८ हेक्टर क्षेत्राला बसला आहे. याबाबत बाधित क्षेत्राचा प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने सादर केला आहे. कृषी विभागाने जरी हा अहवाल सादर केला असला तरी कांद्याच्या लागवडी बाधित झाल्याची स्थिती निम्म्यापेक्षा अधिक असल्याचे कांदा उत्पादक व अभ्यासकांचे म्हणणे आहे. यंदा मॉन्सूनचे आगमन उशिरा झाले त्यात नंतर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कांदा उत्पादकांनी तयार केलेली रोपे खराब झाली. शेतकऱ्यांनी पुन्हा कांद्याची रोपे तयार करून लागवडी केल्या. या लागवडीचे क्षेत्र प्रस्तावित अकडेवारीपेक्षा अडीच पटीने वाढले.

मात्र, उशिरापर्यंत चाललेल्या मॉन्सूनोत्तर पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील कांदा लागवडी मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्या आहेत. सर्वात जास्त नुकसान हे मालेगाव तालुक्यात असून जवळपास संपूर्ण लागवडीखालील क्षेत्र बाधित झाले आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांनी लागवड केलेला लेट खरीप कांदा पावसाच्या तडाख्यात मोठ्या प्रमाणावर बाधित झाला आहे.

एकरी उत्पादनावर परिणाम 
जिल्ह्यातील ३३ टक्के क्षेत्रावरील लागवडी बाधित झाल्याने कांद्याच्या उत्पादनांत कमालीची घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कांदा उत्पादनात कमालीचा फटका बसताना सरासरी एकरी उत्पादनात मोठा परिणाम दिसून येणार आहे. कांदा उत्पादन घटल्यामुळे  पुढील काळात संभाव्य कांदा तुटवड्यातून बाजारपेठेतील कांद्याचे दर देखील वाढण्याची दाट शक्यता आहे.

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार खरीप कांद्याची स्थिती : 

खरीप कांदा  २२७९९ हेक्टर
लेट खरीप कांदा ३०८७३ हेक्टर
एकूण लागवड ५३६७२ हेक्टर
एकूण बाधित क्षेत्र  १७६५८ हेक्टर 
नुकसानीची टक्केवारी  ३२.९०

कांदा लागवड व नुकसानीची प्राथमिक स्थिती 

तालुका लागवड बाधित क्षेत्र  नुकसान (टक्के)
मालेगाव   ८१४६   ८११२    ९९.५८
नांदगाव ७७१९     ३२००   ४१.४५
कळवण    ५०४    १२२  २४.२०
देवळा    ४६५०  ३००० ६४.५१
येवला   ८३२९   ३२२४   ३८.७०
चांदवड  १३३४३     ५७४५      ४३.०३ 

          


इतर अॅग्रो विशेष
मत्स्यदुष्काळ का जाहीर होत नाही?शासनाचे मत्स्यदुष्काळाबाबतचे धोरण अत्यंत चुकीचे...
धुळे ९.४ अंश; थंडीत हळूहळू वाढपुणे ः आकाश निरभ्र झाल्याने थंडीत हळूहळू वाढ होऊ...
साईप्रवरा शेतकरी कंपनीची उलाढाल पोचली...नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) परिसरातील...
उन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोगकोल्हापूर : राज्यात उन्हाळी नाचणीचे यशस्वी...
बाजारात रानमेवा खातोय भावअकोला ः गुलाबी थंडीची चाहूल लागताच बाजारात विविध...
बोगस कीडनाशकांची विक्री ४००० कोटींवर ! पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट...
शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी ‘...सोलापूर : ठाकरे सरकारकडून किचकट ऑनलाइन...
राज्यातील साखर उत्पादन घटणारपुणे: राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या...
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...
द्राक्षाचे ४० वाण आयात करणार : डॉ. ए....पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
सुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवापुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या...
विदर्भापाठोपाठ खानदेशात थंडी वाढतेयपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे...
पणन महासंघाकडून ९ कोटी रुपयांचे चुकारेअमरावती ः राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...
नुकसानग्रस्तांना ५,३०० कोटींचा दुसरा...मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा...
साहेब, शेतीसाठी दिवसा वीज द्या हो...अकोला  ः रब्बी हंगामात सिंचनाचे काम सुरू...
नोकरीला शेतीची जोड देत उंचावले अर्थकारणआसोदे (ता. जि. जळगाव) येथील नीलेश नारायण माळी एका...
प्रक्रिया उद्योगातून सोयाबीनचे...शहरी बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड...