नांदेड जिल्ह्यात पाच लाख खातेदारांना ‘पीएम किसान’चा लाभ

नांदेड जिल्ह्यात : पंतप्रधान किसान सन्‍मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत जिल्ह्यातील चार लाख ९८ हजार ९२४ शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ मिळत आहे.
Benefit of 'PM Kisan' to five lakh account holders in Nanded district
Benefit of 'PM Kisan' to five lakh account holders in Nanded district

नांदेड जिल्ह्यात : पंतप्रधान किसान सन्‍मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत जिल्ह्यातील चार लाख ९८ हजार ९२४  शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ मिळत आहे. यात वार्षिक तीन हप्त्यांत पैसे जमा होतात. प्रत्येक हप्त्याला ९९ कोटी २७ लाख ४८ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर पडत आहेत. जिल्ह्यात वर्षाकाठी २९९ कोटी १७ लाख ४४ हजार रुपयांचा लाभ मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शेतकऱ्यांना निश्‍चि‍त उत्‍पन्न मिळण्‍यासाठी पंतप्रधान किसान सन्‍मान निधी योजना सुरू करण्‍यात आली आहे. नांदेड जिल्‍ह्यातील चार लाख ९८ हजार ६२४ पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबाची माहिती अपलोड करण्‍याचे काम पूर्ण झाले आहे. लाभा‍र्थी कुटुंबांची माहिती अपलोड झालेल्या शेतकऱ्यांना आजपर्यंत सन्‍मान निधी रक्‍कम हप्‍तेनिहाय मिळाली आहे. 

जिल्ह्यात योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत नऊ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. वर्षातून तीन हप्ते शेतकऱ्यांना दिले जात आहेत. यात प्रत्येक हप्त्याला ९९ कोटी २७ लाख ४८ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत. या योजनेमुळे अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरवर्षी जिल्ह्यात तीन हप्त्यामध्ये २९९ कोटी १७ लाख रुपये खात्यांवर जमा होणार आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com