भेंडी उत्पादक शेतकरी विश्‍वनाथ मापारी यांचा नांदेडमध्ये गौरव

भेंडी उत्पादक शेतकरी विश्‍वनाथ मापारी यांचा नांदेडमध्ये गौरव

वाशीम : शेतकरी दिन व सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त नांदेड येथे रविवारी (ता. २५) शेतकरी मेळावा व गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यांतर्गत येत असलेल्या सोमठाणा येथील शेतकरी विश्वनाथ मापारी यांना स्मृतिचिन्ह, मानपत्र, सुरक्षा किट व रोपटे देऊन गौरविण्यात आले. गेल्या आठवड्यात मापारी यांची भेंडी उत्पादनाची यशोगाथा ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत त्यांना या पुरस्कारासाठी निवडण्यात आले.   या कार्यक्रमाचे उद्‍घाटन परभणी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम जगताप, माजी शिक्षण सभापती शिवराज होटाळकर, नांदेड जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर,  मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, किसान ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील परिषदेचे प्रदेशाध्यक्ष संजय दळे, आयोजक तथा डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे कार्याध्यक्ष भागवत देवसरकर, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष धनंजय पाटील, प्रदेश सचिव विवेक सुकणे, देवानंद कदम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com