लखमापूर येथे महिलेवर बिबट्याचा हल्ला

लखमापूर येथे महिलेवर बिबट्याचा हल्ला
लखमापूर येथे महिलेवर बिबट्याचा हल्ला

नाशिक  : जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यांनी धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी शेतशिवार, गोठे व लोकवस्त्यांवर बिबट्यांनी हल्ले केले आहेत. बिबट्याचे नागरिक व जनावरांवर हल्ले झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील हनुमानवाडी शिवारात सोमवारी (ता. २६) शेतात काम करत असलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने महिला गंभीर जखमी झाली. मंगला बाळासाहेब दळवी असे या जखमी महिलेचे नाव आहे. मंगला दळवी या शेतामध्ये काम करत होत्या. याच वेळी अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात यांच्या मानेवर गंभीर जखमा झाल्या आहेत. जखमी दळवी यांना उपचारासाठी दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लखमापूर परिसरात कादवा नदीच्या परिसरात असलेल्या ओढ्या नाल्यामध्ये बिबटे लपून हल्ले करत असल्याचे अनेक प्रकार समोर असून आले आहेत. घटना घडल्यानंतर वन विभाग येऊन पिंजरे लावतात. मात्र बिबट्या न अडकल्याने काही दिवस या समस्येवर पडदा पडतो. मात्र पुन्हा हल्ले झाल्यानंतर पुन्हा यंत्रणा सावध होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. वनविभागाने बिबट्याच्या होणाऱ्या हल्ल्यांमध्ये गांभीर्याने लक्ष देऊन ही समस्या सोडवावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. सध्यातरी बिबट्याच्या या हल्ल्याने परिसरात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com