agriculture news in marathi,bjp dose not make government, mumbai, maharashtra | Agrowon

भाजप सत्ता स्थापन करणार नाही : चंद्रकांत पाटील

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

मुंबई  : आम्हाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले; पण शिवसेना सरकार स्थापन करण्यासाठी सोबत येत नाही म्हणून भाजपने राज्यपालांचे निमंत्रण नम्रपणे नाकारले असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता. १०) सांगितले. जनतेचा कौल महायुतीला होता. याचा अपमान करून शिवसेनेला सरकार स्थापन करायचे असेल तर त्यांना शुभेच्छा, असा टोलाही त्यांनी लगावला. 

मुंबई  : आम्हाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले; पण शिवसेना सरकार स्थापन करण्यासाठी सोबत येत नाही म्हणून भाजपने राज्यपालांचे निमंत्रण नम्रपणे नाकारले असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता. १०) सांगितले. जनतेचा कौल महायुतीला होता. याचा अपमान करून शिवसेनेला सरकार स्थापन करायचे असेल तर त्यांना शुभेच्छा, असा टोलाही त्यांनी लगावला. 

राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केल्यावर  भाजपच्या कोअर समितीकडून चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. भाजपने रविवारी कोअर समितीची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर सरकार स्थापन करण्याचा दावा न करण्याचा निर्णय भाजपने घेतला. भाजपच्या या निर्णयामुळे शिवसेनेला राज्यपालांकडून सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण मिळणार असल्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेने पहिल्यापासून मुख्यमंत्री आमचाच हे स्पष्ट सांगितलेले आहे. त्यामुळे आता राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला तर त्यांच्याजोडीला कोण असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

दरम्यान, चौदाव्या विधानसभेसाठी राज्यात २१ ऑक्‍टोबरला मतदान होऊन २४ ऑक्‍टोबरला मतमोजणी झाली. विधानसभेचे निकाल जाहीर होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला. विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रकाशित झाली आहेत. तरीही, सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाने दावा केला नव्हता. 

या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी घटनेतील तरतुदीनुसार विधानसभेत १०५ आमदारांचे संख्याबळ असलेला सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपकडे पहिल्यांदा विचारणा केली होती. सध्या भाजपकडे सरकार स्थापन करण्यासाठी लागणारे १४५ आमदारांचे संख्याबळ नाही. मुख्यमंत्रिपदावरून वाद असल्याने शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या चर्चा बंद होती. त्यामुळे बहुमत नसताना सरकार स्थापन करायचे नाही, यावर भाजपचे मत ठाम झाले आहे.


इतर ताज्या घडामोडी
जालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी...
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट...नाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३...
परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दहा लाख...परभणी  ः महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...
नाशिक जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमननाशिक : जिल्ह्यात जुलैअखेर पावसाने उघडीप...
पिंपळनेरला कांदा मार्केट सुरू करापिंपळनेर, जि.धुळे  : पिंपळनेर (ता.साक्री)...
शासकीय मका खरेदी बंदमुळे शेतकऱ्यांना...भडगाव, जि. जळगाव  : शासकीय मका खरेदिला...
बार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ...मळेगाव, जि. सोलापूर  ः दीड वर्षांपूर्वी भीषण...
पावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या...सध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी...
धिंगरी अळिंबीचे उत्पादन तंत्रधिंगरी आळिंबी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा...
आणखी तीन सोयाबीन बियाणे कंपन्यांविरुद्ध...अकोला : या हंगामासाठी बाजारपेठेत आणलेले...
नगर जिल्ह्यातील पॉलिहाउसधारक बेदखलनगर ः जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने नगर...
ऐन श्रावणातही नाशिकचा फुलबाजार...नाशिक : धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा...
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणमागील काही दिवसापासून सतत ढगाळ हवामान...
राज्यात टोमॅटो १०० ते ६०० रूपये क्रेटअकोल्यात ३५० ते ६०० रुपये क्रेट अकोला...
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...