कोल्हापूर : गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४९
अॅग्रो विशेष
अतिवृष्टीमुळे मदतीसाठी केंद्राचे निकषांवर बोट
केंद्र सरकारच्या निकषांनुसार अवेळी पाऊस व ढगफुटी एनडीआरएफच्या मदतीस पात्र ठरत नाही, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बळिराजाला राज्य सरकारकडून मदत मिळेल. द्राक्ष, टोमॅटो, कांदे, मका, कापूस, बाजरी, सोयाबीन, भात, उडीद पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
- हरी बाबटीवाले, उपसंचालक, कृषी
सोलापूर : केंद्र सरकारच्या एनडीआरएफमधून मिळणाऱ्या मदतीच्या निकषांमध्ये अवेळी पाऊस अन् ढगफुटी बसत नसल्याची आठवण केंद्र सरकारने राज्य सरकारला करून दिली आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील सुमारे २७ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या मदतीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सत्तास्थापनेच्या संघर्षात आता शेतकऱ्यांना कधीपर्यंत मदत मिळणार, याबाबत अधिकारीही काहीच स्पष्टपणे सांगत नसल्याचे चित्र आहे.
अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल ५४ लाख हेक्टरवरील शेतीपिकांचे सुमारे १४ हजार ७०० कोटींचे नुकसान झाल्याचा नजर अंदाज अहवाल कृषी विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आला.
दरम्यान सोलापूर, नाशिक, परभणी, नांदेड, जालना, बीड, लातूर, अकोला, औरंगाबाद, उस्मानाबाद, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या १७ जिल्ह्यांमध्ये द्राक्ष, टोमॅटो, मिरची, भात, मका, कापूस, बाजरी, फ्लावर, कांदे, सोयाबीन, उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
संबंधित जिल्हाधिकारी व कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. मात्र, अद्याप पाऊस सुरूच असल्याने पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. तत्पूर्वी, विधानसभा निवडणूक होऊनही सरकार स्थापनेचा मुहूर्त ठरलेला नाही. त्यातच पुन्हा केंद्र सरकारने निकषांवर बोट ठेवत मदतीसाठी हात वर केल्याने राज्य सरकारच्या मदतीची नुकसानग्रस्त बळिराजाला प्रतीक्षा लागली आहे.
सर्व काही अतिवृष्टीमुळेच...
राज्यातील १७ जिल्ह्यांमधील २७.६३ लाख शेतकरी हवालदिल ५४ लाख हेक्टरवरील शेतीपिकांचे १७ हजार ७०० कोटींचे नुकसान नव्याने लागवड केलेला कांदा पडला पिवळा : टोमॅटो, कापूस, बाजरी, मका जमीनदोस्त पंचनाम्यांचे आदेश मात्र मनुष्यबळ पडतेय कमीच : पाऊस सुरू असल्याने अहवाल लांबणीवर
- 1 of 436
- ››