agriculture news in Marathi,chandrakant patil praise,make farmers happy, Maharashtra | Page 3 ||| Agrowon

राज्यातील शेतकऱ्यांना सुखी, समाधानी ठेव: चंद्रकांत पाटील

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

पंढरपूर, जि. सोलापूर: दुष्काळ आणि अतिवृष्टीसारख्या दुहेरी संकटाने राज्यातील  शेतकरी अडचणीत आला आहे. या शेतकऱ्यांना या संकटातून बारे काढ, त्यांना सुखी, समाधानी ठेव, असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी (ता. ८) पहाटे श्री विठ्ठल- रुक्‍मिणीच्या चरणी घातले.

पंढरपूर, जि. सोलापूर: दुष्काळ आणि अतिवृष्टीसारख्या दुहेरी संकटाने राज्यातील  शेतकरी अडचणीत आला आहे. या शेतकऱ्यांना या संकटातून बारे काढ, त्यांना सुखी, समाधानी ठेव, असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी (ता. ८) पहाटे श्री विठ्ठल- रुक्‍मिणीच्या चरणी घातले.

महसूलमंत्री पाटील यांच्या हस्ते सपत्निक कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर संत तुकाराम भवन येथे झालेल्या कार्यक्रमात श्री. पाटील बोलत होते. मंत्री पाटील यांच्याबरोबर मानाचे वारकरी म्हणून सुनील महादेव ओमासे आणि त्यांच्या पत्नी सौ. नंदा ओमासे यांना यंदाचा मान मिळाला.

या वेळी विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सौ. अंजली पाटील, शकुंतला नडगिरे, रामचंद्र कदम, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, माजी अध्यक्ष अतुल भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, "या वर्षी राज्यासमोर अनेक आव्हाने आली. सुरुवातील दुष्काळ स्थिती होती. त्यानंतर महापुराला सामोरे जावे लागले आणि आता अवकाळी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना केल्या आहेत. केंद्र सरकारकडेही मदत मागितली आहे. गेली तीन, चार वर्षे वारी निर्मल वारी करण्यासाठी प्रयत्न केला गेला. वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्याला अतिशय चांगले यश आले. पुढील वर्षी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असणार आहे.'''' 

बेडगचे शेतकरी ओमासे ठरले मानाचे वारकरी
यंदा मंत्री पाटील यांच्याबरोबर महापूजेसाठी मानाचे वारकरी ठरलेले सुनील ओमासे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्‍यातील बेडग येथील आहेत. शेतकरी कुटुंबातील ओमासे २००३ पासून नित्यनेमाने वारी करतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मंत्री पाटील यांच्या हस्ते या वेळी त्यांना चांदीची विठ्ठल-रुक्‍मिणी मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मोफत एसटी पासही देण्यात आला.

टाळ-मृदंगाचा गजर अन्‌ हरिनामाचा जयघोष
आषाढी-कार्तिकी या दोन्ही वाऱ्यांपैकी आषाढीप्रमाणेच कार्तिकी वारीलाही तेवढेच महत्त्व असते. गेल्या दोन दिवसांपासून वारकऱ्यांची सातत्याने रीघ पंढरीत सुरू आहे. शुक्रवारी भल्या पहाटे चंद्रभागा नदीवरील स्नान आणि प्रदक्षिणा मार्गावरील फेरीसाठी वारकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. शहरातील विविध मंदिरे, मठ, धर्मशाळांमधून अखंडपणे कीर्तन, प्रवचन आणि भजने सुरूच होती. शिवाय शहरातील प्रमुख मार्गांवरही टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या अखंड जयघोषाने दिंड्या परिक्रमा पूर्ण करत होत्या, त्यामुळे अवघी पंढरी भक्तिमय झाली होती, असे असले तरी यंदा राज्यातील अतिवृष्टीमुळे वारकरी संख्येत काहीशी घट झाली आहे. शुक्रवारी (ता. ८) पंढरपुरात साडेचार लाख वारकरी दाखल झाले होते. दरवर्षी ही संख्या ७ ते ८ लाखाच्याही पुढे असते. आज पदस्पर्श दर्शनाची रांग पत्राशेडच्याही पुढे गेली. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी १२ ते १४ तास लागत होते. 
 


इतर अॅग्रो विशेष
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...
‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडलेपुणे: शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा...
‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ...नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या...
मूग खरेदी एक ऑक्टोबरपासूनमुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव...
मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यतापुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार...
मुसळधार पावसाचा तडाखापुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही...
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा...पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...