agriculture news in Marathi,changes in temperature, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

किमान तापमानात चढ-उतार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

पुणे: मॉन्सूनोत्तर पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या हवामानात बदल होऊ लागले आहेत. किमान तापमान घटल्यानंतर निरभ्र आकाशामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे. तापमानात चढ-उतार सुरू असताना शुक्रवारपर्यंत (ता.१५) मध्य भारतासह महाराष्ट्रातील किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मंगळवारी (ता.१२) सकाळी नगर येथे नीचांकी १४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुणे: मॉन्सूनोत्तर पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या हवामानात बदल होऊ लागले आहेत. किमान तापमान घटल्यानंतर निरभ्र आकाशामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे. तापमानात चढ-उतार सुरू असताना शुक्रवारपर्यंत (ता.१५) मध्य भारतासह महाराष्ट्रातील किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मंगळवारी (ता.१२) सकाळी नगर येथे नीचांकी १४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उत्तर भारतातील राज्यात थंडीचा कडका वाढू लागला आहे. मंगळवारी (ता. १२) हरियानातील हिस्सार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. थंड वाऱ्याचे प्रवाह दक्षिणेकडे येण्यास सुरवात झाली आहे. शुक्रवारपर्यंतच्या (ता. १५) दोन तीन दिवसांत पूर्व आणि मध्य भारतातील राज्यामध्ये तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मंगळवारी (ता. १२) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १७.४ (३), नगर १४.० (-१), जळगाव १९.०(४), कोल्हापूर २०.५(३), महाबळेश्वर १६.०(१), मालेगाव १९.४ (५), नाशिक १७.४ (४), सांगली १९.५ (२), सातारा १७.७ (१), सोलापूर २१.३ (३), अलिबाग २३.४ (२), डहाणू २३.४ (२), सांताक्रूझ २२.८ (१), रत्नागिरी २२.९(१), औरंगाबाद १६.१ (१), परभणी १८.८ (२), नांदेड १८.० (२), उस्मानाबाद १६ (-१), अकोला १८.२ (१), अमरावती १८.६ (१), बुलडाणा १९.० (२), चंद्रपूर २०.६ (३), गोंदिया १६.४(०), नागपूर १६.५ (०), वर्धा १८.५ (२), यवतमाळ १९.०(२).


इतर अॅग्रो विशेष
राज्यातील बाजार समित्या निवडणुका पुढे...पुणे: ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका...
अण्णासाहेब पाटील महामंडळाने १०००...नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास...
शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
‘पोकरा’मध्ये अखेर जबाबदाऱ्यांचे विभाजनअकोला ः पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कृषी...
कृत्रिम रेतन नियंत्रण कायदा कधी? पुणे: पशुधनाच्या आरोग्याला घातक असलेली सध्याची...
किमान तापमानात होतेय घटपुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी...
सात-बारा कोरा करण्याची सुबुद्धी सरकारला...पंढरपूर, जि. सोलापूर: विधानसभा...
सरकारी पीकविमा कंपनी हवी : शेतकरी...नागपूर ः खासगी कंपन्या तयार नसतील तर केंद्राने...
साखर कारखान्यांना लवकरच ‘पॅकेज’मुंबई ः राज्यातील आजारी सहकारी साखर कारखान्यांना...
कमी दरात तूर घेऊन विकली हमीभावाने; दोन...यवतमाळ ः गेल्या हंगामात शेतकऱ्यांकडून कमी दरात...
सेंद्रिय भाजीपाल्याला तयार केले ‘...झुलपेवाडी (जि. कोल्हापूर) येथील चिकोत्रा सेंद्रिय...
शेतकरीहितालाच हवे सर्वोच्च प्राधान्यसहकार क्षेत्रात पूर्वीपासूनच काँग्रेस,...
सोशल मीडिया आणि बॅंकिंग जगात आज कोट्यवधी लोक संवाद करणे आणि माहिती...
बीड जिल्ह्यातील चिंचवडगावमध्ये...बीड: थंड प्रदेशात घेतले जाणारे स्ट्रॉबेरीचे...
राज्यातील ५०० कार्यालयांत शेतकरी...मुंबई : शेतकरी बांधवांना अडचणी मांडण्यासाठी,...
ढगाळ हवामानामुळे गारठा कमीचपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा अभाव, ढगाळ...
राज्य खत समितीचा ‘रिमोट’ कोणाकडे?पुणे : शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी ‘...
महारेशीम अभियानांतर्गत पाच हजार एकरची...औरंगाबाद: रेशीम विभागाच्यावतीने राबविल्या जात...