पीक नुकसानीचे पंचनामे ६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण कराः मुख्यमंत्री

मुख्यमंत्री
मुख्यमंत्री

अकोला  ः राज्यात मागील ३०-४० वर्षांत ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदा मोठा पाऊस झाला. यामुळे ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, या नुकसानाचे बुधवार (ता. ६) पर्यंत प्रशासनाने मिशन मोडवर काम करीत पंचनामे पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.  अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी फडणवीस यांनी रविवारी (ता. ३) अकोला जिल्ह्यातील काही गावांना भेटी दिल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात यंत्रणा प्रमुखांची आढावा बैठक घेतली. या वेळी बोलताना त्यांनी दुष्काळात लागू होणारे सर्व निकष याही परिस्थितीत लागू होत असल्याने कुठल्याही प्रकारची वसुली, वीज कापणीचे काम यंत्रणांनी करू नये, अशी सूचनाही केली. बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, प्रधान सचिव भूषण गगरानी, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.  शेतकरी नेते स्थानबद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला दौऱ्यावर येणार असल्याने येथील शेतकरी संघटनेचे समन्वयक कृष्णा अंधारे व मनोज तायडे यांना पोलिसांनी सकाळीच स्थानबद्ध केले. मुख्यमंत्री परत जाईपर्यंत त्यांना पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com