agriculture news in Marathi,chief minister says,crop inspections complete till 6th November,Maharashtra | Page 2 ||| Agrowon

पीक नुकसानीचे पंचनामे ६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण कराः मुख्यमंत्री

टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

अकोला  ः राज्यात मागील ३०-४० वर्षांत ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदा मोठा पाऊस झाला. यामुळे ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, या नुकसानाचे बुधवार (ता. ६) पर्यंत प्रशासनाने मिशन मोडवर काम करीत पंचनामे पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

अकोला  ः राज्यात मागील ३०-४० वर्षांत ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदा मोठा पाऊस झाला. यामुळे ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, या नुकसानाचे बुधवार (ता. ६) पर्यंत प्रशासनाने मिशन मोडवर काम करीत पंचनामे पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी फडणवीस यांनी रविवारी (ता. ३) अकोला जिल्ह्यातील काही गावांना भेटी दिल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात यंत्रणा प्रमुखांची आढावा बैठक घेतली. या वेळी बोलताना त्यांनी दुष्काळात लागू होणारे सर्व निकष याही परिस्थितीत लागू होत असल्याने कुठल्याही प्रकारची वसुली, वीज कापणीचे काम यंत्रणांनी करू नये, अशी सूचनाही केली. बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, प्रधान सचिव भूषण गगरानी, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

शेतकरी नेते स्थानबद्ध
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला दौऱ्यावर येणार असल्याने येथील शेतकरी संघटनेचे समन्वयक कृष्णा अंधारे व मनोज तायडे यांना पोलिसांनी सकाळीच स्थानबद्ध केले. मुख्यमंत्री परत जाईपर्यंत त्यांना पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. 


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सून मालदिवात दाखल; १ जूनलाच केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत...
भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी...कोल्हापूर: भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात...
लॉकाडाउनमध्येही शेतकऱ्यांकडून शेतमालाची...पुणे (प्रतिनिधी)ः कोरोना टाळेबंदी मध्ये शेतमालाची...
खानदेशात साठा वाढल्याने कापूस, सरकी...जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे...
राज्यातील २८० बाजार समित्या अडचणीत;...लातूर ः राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा...
उष्णतेच्या लाटेमुळे अकोल्यात केळीचे घड...अकोला  ः जिल्ह्यात या आठवड्यात वाढलेल्या...
विदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...
राजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे  : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...
मॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
एसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...पुणे  ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन...
तंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत...अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी...
मॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
टोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...
उन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...
केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...
अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...