मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीद्वारे कृषिपंपांना होणार दिवसा वीजपुरवठा

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीद्वारे  कृषिपंपांना होणार दिवसा वीजपुरवठा
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीद्वारे कृषिपंपांना होणार दिवसा वीजपुरवठा

परभणी : उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजना राबविली जात असून त्याअंतर्गत ५ हजार कोटी रुपये गुंतवणूक केली जात आहे. मुख्यमंत्री सौर कृषिपंप वाहिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे. परभणी जिल्ह्यातील रोहित्र दुरुस्तीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. गेल्या ४ वर्षांत ऊर्जा विभागातर्फे राज्यात ११ हजार कोटी रुपयांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते विश्वास पाठक यांनी ही माहिती सांगितली.

ऊर्जा विभागाच्या ४ वर्षांतील वाटचालीचा आलेख या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन शुक्रवारी (ता. १६) जिल्हा नियोजन सभागृहामध्ये झाले. या वेळी पाठक बोलत होते. राज्याची विजेची मागणी आणि पुरवठ्याचे गणित जुळवून भारनियमनमुक्त महाराष्ट्राचा दावा त्यांनी केला.

पाठक म्हणाले, ‘‘राज्याची विजेची मागणी १८ हजार मेगावॅटवरून २५ हजार मेगावॅटपर्यंत पोचली आहे. महापारेषण, महावितरण व महानिर्मितीचे विद्युत जाळे सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा व्हावा यासाठी उपकेंद्रामध्ये सौरऊर्जानिर्मिती आणि स्वतंत्र वाहिनीचे काम करण्यात येत आहे. उच्चदाब वितरण प्रणाली ही योजना सुरू करण्यात आली आहे. यात एका रोहित्रावर एक किंवा दोन शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळणार आहे. राज्यातील जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.``

‘‘ २०१४ ते २०१७ या कालावधीत वीजनिर्मिती क्षमतेमध्ये एकूण ३ हजार २८० मेगावॅट वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना चक्राकार पद्धतीने दररोज ८ ते १० तास वीजपुरवठा करण्यात येत आहे,`` असे पाठक यांनी सांगितले.

रोहित्र दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागणार परभणी जिल्ह्यातील रोहित्र दुरुस्तीचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल. वीजचोरीवर आळा घालण्यासाठी सर्वांनी सामूहिकपणे काम करण्याची गरज आहे. वीजबिलाची वेळ्याच्यावेळी वसुली होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने वीजग्राहकांनी वेळेवर विजेचा भरणा करावा, असे आवाहन पाठक यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com