पुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची
अॅग्रो विशेष
राज्यात थंडीची चाहूल
पुणे : राज्यातील किमान तापमान कमी होऊ लागल्याने थंडीची चाहूल लागली आहे. पहाटेच्या वेळी अनेक भागांत दाट धुके आणि गारठा जाणवत आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा २० अंशांच्या खाली घसरला आहे. शनिवारी (ता. ९) महाबळेश्वर येथे १३ अंश सेल्सिअस, तर नगर येथे १४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवारपर्यंत राज्याच्या किमान तापमानात २ ते ४ अंशांची घट होऊन गारठा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रातील महा चक्रीवादळ निवळल्यानंतर आजपासून (ता. १०) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तर उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला असून, हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यांमध्ये हिमवृष्टी सुरू झाली आहे. मंगळवारपर्यंत हे थंड वारे मध्य व पश्चिम भारतातील राज्यांकडे येणार आहे. परिणामी किमान तापमानात २ ते ४ अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
शनिवारी (ता. ९) सकाळी सातारा येथे १५ अंश, गोंदिया येथे १६.५ अंश, पुणे १७ अंश, तर नाशिक येथे १७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सांगली, औरंगाबाद, परभणी, अमरावती, बुलडाणा, नागपूर येथे तापमान २० अंशांच्या खाली आले आहे. निरभ्र आकाशामुळे दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत आहे. राज्याचे कमाल तापमान २४ ते ३३ अंशांच्या आसपास असून, सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे ३३.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.
शनिवारी (ता. ९) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १७.० (२.०), नगर १४.६ (-१), जळगाव २१.४(६), कोल्हापूर २०.१(१), महाबळेश्वर १३(२), मालेगाव २०.६ (५), नाशिक १७.६ (३), सांगली १९.५ (१), सातारा १५.० (-२), सोलापूर २०.५ (१), अलिबाग २३.४ (१), डहाणू २४.५ (३), सांताक्रूझ २३.८ (२), रत्नागिरी २१.६(-१), औरंगाबाद १७.१ (१), परभणी १९.६ (२), अकोला २१.१ (३), अमरावती १९.८ (२), बुलडाणा १९.६ (२), चंद्रपूर २१.४ (४), गोंदिया १६.५(१), नागपूर १८.२ (२), वर्धा २१.० (३), यवतमाळ २०.४ (३).