agriculture news in Marathi,cold increased in state, Maharashtra | Agrowon

राज्यात गारठा वाढला; नगर १२.१ अंशावर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

पुणे : किमान तापमानात घट होत असल्याने राज्यात गारठा वाढू लागला आहे. गुरुवारी (ता. १४) सकाळी राज्याच्या किमान तापमानात पुन्हा घट झाल्याचे दिसून आले. नगर येथे राज्यातील यंदाच्या हंगामातील नीचांकी १२.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. कोकण वगळता सर्वच ठिकाणी तापमान २० अंशांच्या खाली घसरल्याने थंडीची चाहूल लागली आहे. 

पुणे : किमान तापमानात घट होत असल्याने राज्यात गारठा वाढू लागला आहे. गुरुवारी (ता. १४) सकाळी राज्याच्या किमान तापमानात पुन्हा घट झाल्याचे दिसून आले. नगर येथे राज्यातील यंदाच्या हंगामातील नीचांकी १२.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. कोकण वगळता सर्वच ठिकाणी तापमान २० अंशांच्या खाली घसरल्याने थंडीची चाहूल लागली आहे. 

दोन दिवसांपासून राज्याच्या कमान आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. दिवसभर उन्हाचा चटका वाढून काहीसे ढगाळ हवामान होत असल्याने उकाडा जाणवत आहे. तर दोन दिवस किमान तापमानातही काहीशी वाढ झाली होती. मात्र गुरुवारी विदर्भ, मराठवाडा, विदर्भाच्या किमान तापमानात पुन्हा मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले. मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी तापमान सरासरीच्या खाली उतरले आहे. जम्मू-काश्‍मीर, हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होत आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्राकडे येऊन शनिवारपर्यंत किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. 

गुरुवारी (ता. १४) उत्तर प्रदेशातील चुर्क येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ११.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात नगरसह महाबळेश्‍वर, मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद, विदर्भातील नागपूर, यवतमाळ येथे तापमान १५ अंशांच्या खाली आले आहे. तर पुणे, नाशिक, नांदेड, अकोला, बुलडाणा, गोंदिया, वर्धा येथे तापमान १५ अंशांच्या जवळपास आहे. कोकणात सर्वच ठिकाणी किमान तापमान २० अंशांच्या वर आहे. आज राज्यात मुख्यत: कोरड्या व थंड हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.      

गुरुवारी (ता. १४) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १५.३ (१), नगर १२.१ (-३), जळगाव १६.६(१), कोल्हापूर १८.६(१), महाबळेश्वर १३.४(-१), मालेगाव १७.० (२), नाशिक १५.२ (१), सांगली १८.० (०), सातारा १६.० (२), सोलापूर १९.२ (१), अलिबाग २२.७ (१), डहाणू २३.७ (२), सांताक्रूझ २२.० (१), रत्नागिरी २१.० (-१), औरंगाबाद १२.६ (-३), परभणी १४.७ (-२), नांदेड १५.५ (-१), उस्मानाबाद १३.० (-३), अकोला १५.२ (-२), अमरावती १५.८ (-२), बुलडाणा १५.० (-२), चंद्रपूर १७.६ (०), गोंदिया १५.४ (-१), नागपूर १४.४ (-२), वर्धा १५.४ (-१), यवतमाळ १४.० (-३).


इतर अॅग्रो विशेष
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...
द्राक्षाचे ४० वाण आयात करणार : डॉ. ए....पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
सुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवापुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या...
विदर्भापाठोपाठ खानदेशात थंडी वाढतेयपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे...
पणन महासंघाकडून ९ कोटी रुपयांचे चुकारेअमरावती ः राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...
नुकसानग्रस्तांना ५,३०० कोटींचा दुसरा...मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा...
साहेब, शेतीसाठी दिवसा वीज द्या हो...अकोला  ः रब्बी हंगामात सिंचनाचे काम सुरू...
नोकरीला शेतीची जोड देत उंचावले अर्थकारणआसोदे (ता. जि. जळगाव) येथील नीलेश नारायण माळी एका...
प्रक्रिया उद्योगातून सोयाबीनचे...शहरी बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड...
शेवतींच्या फुलांनी जिंकले मन !...मांजरी, पुणे : विविधरंगी शेवंतीच्या फुलांनी...
कमी पाण्यामध्ये सीताफळाचे किफायतशीर...सिंचनासाठी पाण्याच्या कमतरतेसह प्रतिकूल...
दर्जेदार वांगी उत्पादनात मानेंचा हातखंडाकसबे डिग्रज (ता. मिरज, जि. सांगली) येथील युवा...
देशी कपाशीतील संशोधनाची शंभरीपरभणी येथील कापूस संशोधन केंद्र, मेहबूब बागची...
जैवविविधता संवर्धनासाठी सामूहिक...नाशिक: पर्यावरणाची योग्य ती काळजी न घेतल्याने...
देशी कापसाचा ब्रॅंड आवश्‍यकपरभणी ः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लांब धाग्याच्या...
...'या' बॅंकांचे थकले चौदा हजार कोटी...पुणे : कोरड्या दुष्काळानंतर ओला दुष्काळ आणि त्यात...
तागाच्या पिशव्यांकडे साखर कारखान्यांची...कोल्हापूर : ताग उत्पादकांना चालना देण्यासाठी...