agriculture news in Marathi,cold remain in vidarbha and Marathwada, Maharashtra | Agrowon

विदर्भ, मराठवाड्यात गारठा कायम

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या विविध भागात ढगाळ हवामान होत असल्याने किमान वाढ झाली आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा खाली आल्याने गारठा कायम असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी (ता. १६) उस्मानाबाद येथे राज्यातील निचांकी १४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १७) राज्यात अंशत: ढगाळ व कोरड्या हवामानाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.     

पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या विविध भागात ढगाळ हवामान होत असल्याने किमान वाढ झाली आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा खाली आल्याने गारठा कायम असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी (ता. १६) उस्मानाबाद येथे राज्यातील निचांकी १४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १७) राज्यात अंशत: ढगाळ व कोरड्या हवामानाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.     

उन्हाचा चटका आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात असलेली चक्राकार वाऱ्याची स्थिती यामुळे राज्याच्या काही भागात ढगाळ हवामान होत आहे. शनिवारी (ता.१६) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामान होते. तर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली होती. ढगाळ हवामानामुळे तापमानात चढ-उतार सुरू राहणार असून, कडाक्याच्या थंडीसाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या बहुतांशी भागात तापमान सरासरीच्या खाली तर कोकण व मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा वर असल्याचे दिसून आले आहे. मध्य प्रदेशातील पंचमढी येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

शनिवारी (ता. १६) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १८.४ (४), नगर १५.४ (०), जळगाव १७.६(३), कोल्हापूर २१.५(४), महाबळेश्वर १६.१(१), मालेगाव १९.२ (५), नाशिक १८.३ (५), सांगली २१.१ (३), सातारा १९.४ (३), सोलापूर २२.५ (४), अलिबाग २४.४ (३), डहाणू २४.२ (३), सांताक्रूझ २३.८ (२), रत्नागिरी २३.६ (१), औरंगाबाद १५.३ (०), परभणी १६.८ (०), नांदेड १८.० (२), उस्मानाबाद १४.४ (-१), अकोला १६.३ (-१), अमरावती १६.२ (-२), बुलडाणा १७.० (०), चंद्रपूर १८.० (१), गोंदिया १५.२ (-२), नागपूर १५.० (-१), वर्धा १६.४ (०), यवतमाळ १५.४ (-२). 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...
सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...
पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...
निर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
खारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...