औरंगाबाद येथे कारले १५०० ते २२०० रुपये क्विंटल

कारली
कारली

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ७) कारल्याची ५२ क्‍विंटल आवक झाली. कारल्याला १५०० ते २२०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली.

बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ९० क्‍विंटल आवक झाली. मिरचीला २२०० ते ३००० रुपये क्‍विंटल दर मिळाले. कांद्याची ३८० क्‍विंटल आवक झाली. कांद्यास ७०० ते १३०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. टोमॅटोची ११३ क्‍विंटल आवक होती. टोमॅटोला १००० ते १५०० रुपये क्‍विंटल दर मिळाले. वांग्याची ४३ क्‍विंटल आवक झाली. वांग्याला ६०० ते ९०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. गवारीची १५ क्‍विंटल आवक झाली. गवारीला २५०० ते ३००० रुपये क्‍विंटल दर मिळाले. भेंडीची २७ क्‍विंटल आवक झाली. भेंडीला २००० ते २१०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. काकडीची आवक ७८ क्‍विंटल झाली. काकडीला ५०० ते ७०० रुपये क्‍विंटल दर मिळाले.

बाजारसमितीत लिंबाची २० क्‍विंटल आवक झाली. लिंबाला ६०० ते ७०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. दुधीभोपळ्याची २० क्‍विंटल आवक झाली. त्यास ४०० ते ८०० रुपये क्‍विंटल दर राहिले. कोबीची ८५ क्‍विंटल आवक झाली. कोबीला ५०० ते ७०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. फ्लॉवरची ६३ क्‍विंटल आवक झाली. फ्लॉवरला १००० ते १५०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. ढोबळी मिरचीची ३० क्‍विंटल आवक झाली. ढोबळी मिरचीला ३००० ते ३२०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. शेवग्याची १४ क्‍विंटल आवक झाली. शेवग्याला ३००० ते ५००० रुपये क्‍विंटल दर मिळाला. कैरीची ६७ क्‍विंटल आवक झाली. कैरीला १००० ते ४२०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला.

भुईमूग शेंगांची ३० क्‍विंटल आवक झाली. या शेंगांना २५०० ते ३५०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. मेथीची आठ हजार जुड्या आवक झाली. मेथीला ६०० ते ८०० रुपये शेकडा असा दर मिळाला. पालकची आवक ९ हजार जुड्या झाली. त्यास ४०० ते ५०० रुपये प्रतिशेकडा दर राहिला. कोथिंबिरीची ३२ हजार जुड्या आवक झाली. २०० ते ४०० रुपये शेकडा असा दर मिळाल्याची माहिती समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com