औरंगाबाद येथे कोबी १००० ते १५०० रुपये क्‍विंटल

औरंगाबाद येथे कोबी १००० ते १५०० रुपये क्‍विंटल

औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ३) कोबीची ७० क्‍विंटल आवक झाली. कोबीला १००० ते १५०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ११३ क्‍विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला १००० ते १५०० रुपये क्‍विंटल दर मिळाला. कांद्याची ६३० क्‍विंटल आवक झाली. कांद्याला ३०० ते ११०० रुपये क्‍विंटल दर मिळाला. टोमॅटोची १३० क्‍विंटल आवक झाली. टोमॅटोला ५०० ते १५०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. वांग्याची ३२ क्‍विंटल आवक झाली. वांग्याला ५०० ते १००० रुपये क्‍विंटल दर मिळाला. गवारीची १३ क्‍विंटल आवक झाली. गवारीला २००० ते २३०० रुपये क्‍विंटल दर मिळाला.

बाजारसमितीत भेंडीची आवक २५ क्‍विंटल झाली. भेंडीला १६०० ते २६०० रुपये क्‍विंटल दर मिळाला. काकडीची आवक ११५ क्‍विंटल होती. काकडीला ४०० ते ७०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. लिंबाची २५ क्‍विंटल आवक झाली. लिंबाला ५०० ते ८०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला.  कारल्याची आवक ३१ क्‍विंटल होती. कारल्याला १००० ते १६०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. फ्लॉवरची ६५ क्‍विंटल आवक झाली. फ्लाॅवरला ६०० ते १६०० रुपये क्‍विंटल दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची आवक २४ क्‍विंटल झाली. ढोबळी मिरचीला २२०० ते ३००० रुपये क्‍विंटल दर मिळाले. शेवग्याची १३ क्‍विंटल आवक झाली. शेवग्याला २५०० ते ३००० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला.

मेथीची २६ हजार जुड्या आवक झाली. मेथीला २०० ते ३०० रुपये प्रतिशेकडा असा दर मिळाला. पालकाची २२ हजार जुड्या आवक झाली. पालकचे दर १०० ते २०० रुपये प्रतिशेकडा राहिले. कोथिंबिरीची ७५ हजार जुड्या आवक झाली. कोथिंबिरीला १५० ते ५५० रुपये प्रतिशेकडा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com