परभणीत मेथी ५०० ते ८०० रुपये शेकडा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये बुधवारी (ता. ११) मेथीची २० हजार जुड्या आवक होती. मेथीला प्रतिशेकडा ५०० ते ८०० रुपये दर मिळाल्याची माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

मार्केटमध्ये  शेवग्याची ७ क्विंटल आवक झाली. शेवग्याला ३००० ते ४००० रुपये क्विंटल दर मिळाले. गवारीची १४ क्विंटल आवक होती. गवारीला २००० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. चवळीची ७ क्विंटल आवक होती. चवळीला २००० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले.पालेभाज्यांमध्ये पालकाची १५ क्विंटल आवक होती. पालकास ५०० ते ८०० रुपये क्विंटल दर मिळाले. चुक्याची १० क्विंटल आवक होती. चुक्याला ५०० ते १२०० रुपये क्विंटल दर मिळाले. शेपूची २५ क्विंटल आवक होती. शेपूला ४०० ते १००० रुपये क्विंटल दर मिळाले.कोथिंबिरीची १०० क्विंटल आवक होती. कोथिंबिरीला १००० ते २००० रुपये क्विंटल दर मिळाले.

मार्केटमध्ये भेंडीची १० क्विंटल आवक होती. भेंडीला ३००० ते ३५०० रुपये क्विंटल दर मिळाले. कोबीची २० क्विंटल आवक होती. कोबीला ८०० ते १२०० रुपये क्विंटल दर मिळाले. फ्लॅावरची १० क्विंटल आवक होती. फ्लॅावरला २५०० ते ३५०० रुपये क्विंटल दर मिळाले. काकडीची ५० क्विंटल आवक होती. काकडीला ३०० ते ७०० रुपये क्विंटल दर मिळाले.  कारल्याची १२ क्विंटल आवक होती. कारल्याला २००० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. हिरव्या मिरचीची ८० क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला २००० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ३ क्विंटल आवक होती.ढोबळ्या मिरचीला २५०० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. वांग्याची २५ क्विंटल आवक होती. वांग्याला ८०० ते १५०० रुपये क्विंटल दर मिळाले.

टोमॅटोची ५०० क्विंटल आवक होती. टोमॅटोला १५०० ते २५०० रुपये क्विंटल दर मिळाले.  दुधी भोपळ्याची १० क्विंटल आवक होती. दुधी भोपळ्याला ५०० ते ८०० रुपये क्विंटल दर मिळाले.  जांभळाची ७ क्विंटल आवक होती. जांभळाला २५०० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. लिंबांची २५ क्विंटल आवक होती. लिंबाला ६०० ते १२०० रुपये क्विंटल दर मिळाले. कैरीची ६० क्विंटल आवक होती. कैरीला १२०० ते १८०० रुपये क्विंटल दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com