पुण्यात कांदा, लसूण, फ्लॉवरच्या दरात वाढ

पुणे बाजारसमितीत झालेली आंब्याची आवक
पुणे बाजारसमितीत झालेली आंब्याची आवक

पुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २१) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवकेत वाढ झाली होती. मात्र सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाल्याने आवक सरासरीपेक्षा मंदावली आहे. दरम्यान कांदा, लसूण, फ्लॉवर, सिमला मिरची, गाजर, तांबडा भोपळा यांच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली होती तर पालेभाज्यांचे वाढलेले दर स्थिर होते.  

विविध भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरचीची, हिमाचल प्रदेशातून सुमारे ४ ट्रक मटारची, कर्नाटक आणि गुजरात येथून ३ ट्रक कोबीची, कर्नाटकमधून तोतापुरी कैरीची सुमारे ५ टेम्पो, बंगळूर येथून आल्याची १ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी आवक झाली होती.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आल्याची सुमारे १ हजार गोणी, टोमॅटोची सुमारे ५ हजार क्रेट, कोबी आणि फ्लॉवरची प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, ढोबळी मिरचीची ८ टेम्पो, तांबड्या भोपळ्याची १० टेम्पो, काकडीची १०, वांगीची १० ते १२ टेम्पो, कांद्याची सुमारे ७० ट्रक तर स्थानिकसह आग्रा, इंदूर येथून बटाट्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दर (प्रति दहा किलो) ः  कांदा - ६०-९०, बटाटा- १००-१५०, लसूण - ७००-९००, आले : सातारी ५५०-६५०, भेंडी : ३००-४००, गवार : ३००-५००, टोमॅटो - ८०-१२०, दोडका : ३००-४००, हिरवी मिरची : ३५०-५००, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : २००-२५०, काकडी : ८०-१००, कारली : हिरवी ३५०-४००, पांढरी २००-२५०, पापडी : ४०० -४५०, पडवळ :३००-३५०, फ्लॉवर : १४०-१६०, कोबी : ८०-१२०, वांगी : १०० -२००, डिंगरी : २०० -२५०, नवलकोल :१०० -१२०, ढोबळी मिरची : ४००-४५०, तोंडली : कळी ३००- ३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : १८०-२००, गाजर : १४०- १६०, वालवर : ३५०-४००, बीट : ८०-१००, घेवडा : ६००-६५०, कोहळा : १५० -२००, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे :२०० -२५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग : ४०० -४५०, पावटा : ५०० -५५०, मटार : ४५०-४६०, तांबडा भोपळा १५०-२००, चिंच अखंड ३०० -३५०, सुरण : २५०-२६०, मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.  

पालेभाज्या पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे सव्वा लाख, तर मेथीची सुमारे ५० हजार जुड्या आवक झाली होती.  पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) :   कोथिंबीर : १३०० -१६००, मेथी : ६००-१०००, शेपू : ७००-१०००, कांदापात : ८०० -१०००, चाकवत : ५०० -६००, करडई : ५०० -६००,  पुदिना : १५० -२००, अंबाडी : ७००-८००, मुळे : १०००-१२००, राजगिरा : ५०० -७००, चुका : ८००-१०००, चवळई : ६०० -८००, पालक : ६०० -८००.  

फळबाजार रविवारी (ता. २१) मोसंबीची सुमारे ५० टन, संत्रीची २० टन, डाळिंबाची २०० टन, पपईची १० टेम्पो, लिंबाची सुमारे दोन हजार गोणी, चिकूची २ हजार डाग, कलिंगडाची ३० टेम्पो, खरबूजाची २५ टेम्पो, आणि द्राक्षांची ३ टन आवक झाली होती. कोकणातून हापूस आंब्याची सुमारे पाच हजार पेटी आवक झाली होती. कर्नाटकातून विविध जातींच्या आंब्याची सुमारे १५ हजार पेटी, करंडीची आवक झाली होती.

फळांचे भाव : लिंबे (प्रति गोणी) : ६००-११००, मोसंबी : (३ डझन) : १५०-३५०, (४ डझन ) : ६०-१५०, संत्रा : (३ डझन) : १८०-४५०, (४ डझन) : ७०-२००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-६०, गणेश ५-२०, आरक्ता ५-४०. कलिंगड : ५-१२, खरबूज : १०-२०, पपई : ५-२०, चिकू : १००-८५०, द्राक्षे : सुपर सोनाका (१५ किलो) १०००-१३००, माणिकचमन (१५ किलो) ७००-९००. आंबा (कर्नाटक) : बदाम (१ किलो) ३०-४०, लालबाग २५-४५, हापूस (४-५ डझन) ८००-१६००, पायरी (५ डझन) ५००-८००. कोकण हापूस (४-८ डझन) तयार - १५००-३५००, (५ ते १० डझन) तयार २००० ते ४५००.

फूलबाजार उन्हाळ्यामुळे विविध फुलांचे उत्पादन घटले असून, लग्न हंगाम सुरू असल्याने विविध फुलांना मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे. शोभिवंत फुलांना विशेष मागणी असल्याने त्यांच्या दरात उल्लेखनीय वाढ झाली आहे.

फुलांचे दर (प्रति किलो) : झेंडू : ३०-६०, गुलछडी : १००-१२०, बिजली : ४०-८०, कापरी : २०-६०, मोगरा : २००-३००, ॲस्टर : १२-१६, (गड्ड्यांचे भाव) गुलाब गड्डी : २०-४०, गुलछडी काडी : ४०-६०, डच गुलाब (२० नग) :६०-१२०, लिली बंडल : ६-१०, जरबेरा : ४०-७०, कार्नेशियन : १००-१५०.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com