Agriculture news in marathi;Completed 297 works in 'Sujlam Sufalam' in Washim district | Agrowon

वाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७ कामे पूर्ण
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 जुलै 2019

वाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर आणि वाशीम या सहा तालुक्यांत जलसंधारणाची एकूण २९७ कामे पूर्ण झाली आहेत. १२८ गावांमध्ये ही कामे झाली असून २५ लाख ७७ हजार घनमीटर एवढे काम झाले असल्याची माहिती या अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक विशाल नागनाथवार यांनी दिली.

वाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर आणि वाशीम या सहा तालुक्यांत जलसंधारणाची एकूण २९७ कामे पूर्ण झाली आहेत. १२८ गावांमध्ये ही कामे झाली असून २५ लाख ७७ हजार घनमीटर एवढे काम झाले असल्याची माहिती या अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक विशाल नागनाथवार यांनी दिली.

वाशीम जिल्ह्यात शासनाचा जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटनेच्यावतीने सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त अभियानांतर्गत नाला खोलीकरण, नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण, शेततळे, सीसीटी, डीपसीसीटी, शेतांची बांधबंदिस्ती, माती नालाबांध, गावतलावातील गाळ काढणे आदी कामे १२८ गावात गेल्या सहा महिन्यांत करण्यात आली. या कामाकरिता भारतीय जैन संघटनेकडून २८ जेसीबी व १४ पोकलेड उपलब्ध करून देण्यात आली. याद्वारे जिल्ह्यातील २९७ कामे पूर्ण करण्यात आली. या कामाकरिता शासनाकडून ५३ लाख ८३३ लिटर्स डिझेल वापरण्यात आले. यामध्ये पोकलेंनने ३७ हजार ९४० तास काम करण्यात आले. याकरिता बीजेएसकडून पोकलेन भाडे २ कोटी ९२ लाख रुपये देण्यात आले. तर जेसीबीने १५,९५१ तास काम करण्यात आले. 

जलसंधारणाच्या कामाकरिता कृषी विभागाची १८९ कामे तर वनविभागाची १२ कामे, जलसंपदा विभागाची १२ कामे, जलसंधारण विभागाची ४२ कामे व जिल्हा परिषद लघू सिंचन विभागाची ४२ कामे पूर्ण असे एकूण २९७ कामे पूर्ण झाली. पहिल्याच पावसात जलसंधारणाची पात्रे पूर्ण भरलेली सध्या दिसून येत आहेत. या साठलेल्या पाण्यामुळे परिसरातील विहिरीच्या पातळीत वाढ झाली आहे. या कामाकरिता जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचे श्री. नागनाथवार यांनी सांगितले.

इतर बातम्या
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
खानदेशात कापूस पिकात मर रोग, मूळकूजजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळे व नंदुरबार...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
...अन् नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले...मुंबई  ः कोणताही अन्याय सहन करायचा नाही, या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात केळी, नारळ, सुपारी... सिंधुदुर्ग  ः कुणी तीन लाख तर कुणी दोन...
राष्ट्रपतींनी घेतला सूतकताईचा अनुभववर्धा  ः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
पीएच.डी.साठी गुरुवारी सामाईक प्रवेश...पुणे ः  राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील...
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-... भंडारा  ः विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस...
कोयना धरणातून ६७ टीएमसी पाण्याचा विसर्गसातारा : या महिन्याच्या सुरवातीपासून मुसळधार...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
मराठवाड्यात पाणीसाठ्याची स्थिती विदारकऔरंगाबाद : अर्धा पावसाळा लोटला तरीही मराठवाड्यात...
बुलडाणा जिल्ह्यात निर्माण झाली १३२५...बुलडाणाः जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटना...
कोकणात नुकसानभरपाईचे वेगळे निकष लावा :...रत्नागिरी : ‘‘सांगली, कोल्हापूरप्रमाणेच कोकणातील...
सिंधुदुर्गात अतिवृष्टीने महावितरणचे चार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि...