agriculture news in marathi,Compulsory land acquisition for 213 hectares for prosperity | Agrowon

नाशिक : समृद्धीसाठी २१३ हेक्टरचे सक्तीने भूसंपादन

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 ऑगस्ट 2018
नाशिक : राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी जिल्ह्यातील १९ गावांमधील २१३ हेक्टर क्षेत्राच्या अधिग्रहणाची अंतिम अधिसूचना रस्ते विकास महामंडळाने शुक्रवारी प्रसिद्ध केली. यामुळे आता भूसंपादन कायद्यान्वये जमीन संपादित करणे प्रशासनाला शक्य होणार आहे.
नाशिक : राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी जिल्ह्यातील १९ गावांमधील २१३ हेक्टर क्षेत्राच्या अधिग्रहणाची अंतिम अधिसूचना रस्ते विकास महामंडळाने शुक्रवारी प्रसिद्ध केली. यामुळे आता भूसंपादन कायद्यान्वये जमीन संपादित करणे प्रशासनाला शक्य होणार आहे.
नागपूर ते मुंबई हे अंतर काही तासांमध्ये पार करता यावे, यासाठी समृद्धी महामार्गाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला आहे. जिल्ह्यातील सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यांमधून हा महामार्ग जाणार असून, त्यासाठी आतापर्यंत ९०० हेक्टर जमीन थेट खरेदीद्वारे संपादित करण्यात आली आहे. परंतु, कौटुंबिक वाद, न्यायालयीन प्रकरणे आणि प्रकल्पासाठी जमीन देण्यास असणारा विरोध यांमुळे २१३ हेक्टर जमीन अजूनही अधिग्रहित होऊ शकलेली नाही. त्यामुळे २०१३ च्या भूसंपादन कायद्यान्वये या जमिनी अधिग्रहित करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली होती.
आता भूसंपादन कायद्यान्वये जमिनी अधिग्रहित करण्यात येणार असल्याने जमीनमालकांना चारपट मोबदला मिळणार आहे.
 
भूसंपादन कायद्यान्वये सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यांतील धामणगाव, गंभीरवाडी, बेलगाव तऱ्हाळे, धामणी, पिंपळगाव मोर, उभाडे, देवळे, खैरगाव, शेनवड बु., कांचनगाव, अवचितवाडी, तळोघ, तळोशी, पिंप्री सद्रोद्दिन, नांदगाव सदो, तारांगण पाडा, फांगुळ गव्हाण, बोर्ली आणि वाघ्याची वाडी आदी गावांमधील जमिनी संपादित करण्यात येणार आहेत.

इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...