Agriculture news in marathiCongress-NCP Sangli 'Digvijay' | Agrowon

काँग्रेस-राष्ट्रवादीचा सांगलीत ‘दिग्विजय’ 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे पंधरावे महापौर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी यांची तर उपमहापौरपदी काँग्रेसचे उमेश पाटील यांची निवड झाली.

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे पंधरावे महापौर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी यांची तर उपमहापौरपदी काँग्रेसचे उमेश पाटील यांची निवड झाली. त्यांच्या निवडीने पालिकेच्या इतिहासात प्रथमच आलेली भाजपची पूर्ण बहुमताची सत्ता अडीच वर्षांत उलथली आहे.

भाजपचे सात सदस्य फुटले होते, त्यापैकी पाच जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केले, तर दोघे गैरहजर राहिले. दिग्विजय सूर्यवंशी यांना ३९ तर धीरज सूर्यवंशी यांना ३६ मते पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी काम पाहिले. 

महापालिका महापौर आणि उपमहापौर पदासाठी साडेअकरा वाजता प्रत्यक्ष प्रक्रियेस सुरुवात झाली. ऑनलाइन होणाऱ्या या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी कोल्हापुरातून तर भाजपच्या सदस्यांनी खरे क्‍लब हाऊसमधून मतदान केले. साडेअकरा वाजता प्रत्यक्ष प्रक्रियेस सुरुवात झाली. त्यानंतर पंधरा मिनिटे अर्ज माघारीसाठी होती. त्यानंतर दिलेल्या लिंकद्वारे बारा वाजता ऑनलाइन मतदान झाले.

गेले चार दिवस भाजपचे सदस्य ‘नॉट रिचेबल’ होते. त्यामुळे भाजपचे महापौरपदाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी आणि गजानन मगदूम साशंक होतेच. महापौरपदासाठीचा आघाडीचा उमेदवार कॉँग्रेसचा की राष्ट्रवादीचा या बाबतचा सस्पेन्सही कायम होता. कॉँग्रेसच्या उत्तम साखळकर व राष्ट्रवादीच्या मैन्नुदीन बागवान यांनी माघार घेत दिग्विजय सूर्यवंशी यांचा मार्ग मोकळा केला.

भाजपकडे ४२ जणांचे बहुमत होते. मात्र त्यांची सकाळपर्यंतची जुळणी ३६ जणांपर्यंतच झाली होती. दोन सहयोगी सदस्यांपैकी भाजपचे उपमहापौरपदाचे उमेदवार मगदूम होते. अन्य सहयोगी सदस्य विजय घाडगे यांनी कॉँग्रेस आघाडीला मतदान केले. त्यांच्या शिवाय नसीम नाईक, स्नेहल सावंत, अपर्णा कदम, महेंद्र सावंत यांनीही राष्ट्रवादीला मतदान केले. त्यामुळे भाजपच्या चार मतांसह त्यांची हक्काची एकूण सात मते फुटली आणि भाजपचे संख्याबळ ३६ वर घसरले. 

जयंत पाटील यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ 
निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. जनतेने भाजपला दिलेल्या सत्तेत स्वारस्य नाही, असे सांगत प्रारंभी जयंत पाटील यांनी भाजपला गाफील ठेवले. मात्र संधी येताच करेक्‍ट कार्यक्रम केला. जयंत पाटील यांच्या खेळीने भाजपला नेस्तनाबूत केले. भाजपची पूर्ण बहुमताने आलेली सत्ता प्रथमच उलथवली. 


इतर ताज्या घडामोडी
शहरातील आठवडे बाजारांवर महापालिका...पुणे ः शेतकऱ्यांच्या शेतमालाला मध्यस्थाशिवाय थेट...
अखाद्य वस्तूंमुळे जनावरांना होणारे अपाय जनावरांना होणारे सर्वसामान्य संसर्गजन्य आजार हे...
परभणी जिल्ह्यात कृषी, पशुसंवर्धनासाठी...परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या...
काबुली हरभऱ्याचा दर आठ हजार रुपयांवरजळगाव  ः  खानदेशात काबुली हरभऱ्याची आवक...
‘रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप...सातारा :  ‘‘या वर्षी चांगला पाऊस पडला....
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ...अकोला : इतर मागासप्रवर्गासाठी (ओबीसी) असलेल्या २७...
‘भरड धान्य खरेदी केंद्रांसाठी तातडीने...जळगाव  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात फक्त मका...
तापमानात वाढ होण्यास सुरुवातमार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रावरील...
तेलकट डाग रोग व्यवस्थापनाच्या सहा...तेलकट डाग रोग (बॅक्टेरियल ब्लाइट किंवा बीबीडी)...
‘जलयुक्त’च्या कामाची धारवाडी, चिचोंडीत...नगर : जलयुक्त शिवार अभियानातील तक्रारी असलेल्या...
अकोला जिल्हा परिषदेत ओबीसी सदस्यांवर...अकोला : इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) असलेल्या...
उत्तर सोलापुरात २३ गावांचे होणार...सोलापूर : ‘‘गावठाणातील जमिनींचे ड्रोनद्वारे...
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना...औरंगाबाद : ‘‘असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म अन्न...
खानदेशात जलसाठा मुबलक जळगाव : खानदेशात विविध प्रमुख सिंचन...
हरभरा दर सुधारल्याने नांदेडचे शेतकरी...नांदेड : ‘‘केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार...
परभणी जिल्ह्यात तुती लागवडीसाठी ५८५...परभणी ः ‘‘महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेती...
साताऱ्यात ४३१ कुटुंबांच्या घराचे स्वप्न...कऱ्हाड : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी १००...
सामूहिक गट शेतीतील ऊस तोडणीस सुरुवात नाशिक : सटाणा तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीस...
परभणी जिल्ह्यातील हरभऱ्याचा पीकविमा...परभणी ः लिमला (ता. पूर्णा) तसेच परिसरात यंदा...
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी शासनाची...मुंबई : राज्यातील धुळे, नंदुरबार, नागपूर, अकोला,...