agriculture news in marathi,Consolidated two thousand forms for the Shetkari sanman yojana | Agrowon

कोल्हापूर : शेतकरी सन्मान योजनेसाठी दोन हजार अर्ज संकलित
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 जुलै 2019

कोल्हापूर : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी विशेष मोहिमेअंतर्गत दोन हजार अर्ज संकलित केल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

देशातील शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’ योजना सुरू केली आहे. सुरवातीला ही योजना अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना (२ हेक्टरच्या आतील) मर्यादित होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील ३.७६ लाख अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली असून, ती पीएम किसान पोर्टलवर अपलोड करण्यात आली.

कोल्हापूर : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी विशेष मोहिमेअंतर्गत दोन हजार अर्ज संकलित केल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

देशातील शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’ योजना सुरू केली आहे. सुरवातीला ही योजना अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना (२ हेक्टरच्या आतील) मर्यादित होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील ३.७६ लाख अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली असून, ती पीएम किसान पोर्टलवर अपलोड करण्यात आली.

शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार, क्षेत्राची अट शिथिल करून पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या सरसकट सर्व शेतकरी कुटुंबांना ही योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी यांच्याकडून या योजनेचा लाभ देण्यासाठी माहिती संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

तथापि, पात्रतेचे निकष बदलल्यानंतर अजूनही जिल्ह्यातील संभाव्य पात्र शेतकरी कुटुंबांच्या संख्येच्या तुलनेत, संकलित केलेली शेतकरी कुटुंबीयांची माहिती अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असलेल्या कोणत्याही शेतकऱ्याला या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ४ जुलैपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व नायब तहसीलदार आदी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांमार्फत या योजनेतील कामाची टक्केवारी सर्वात कमी आहे अशा गावांना स्वत: भेटी देऊन तपासणी करावी. त्यानुसार तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्वांत कमी काम झालेल्या प्रत्येकी ५ गावांना भेटी देऊन माहिती संकलित करण्यात येणाऱ्या अडचणीची पडताळणी करून या योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोचून कोणीही पात्र शेतकरी खातेदार या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याबाबत जिल्हाधिकारी देसाई यांनी सूचना दिल्या आहेत.

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...