नगर जिल्ह्यात पावसाने ९४ टक्के कापसाचे नुकसान

नगर जिल्ह्यात पावसाने ९४ टक्के कापसाचे नुकसान

नगर ः आक्टोबर महिन्यात पावसाने झालेल्या नुकसानीची दाहकता पंचनाम्यानंतर समोर आली आहे. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कापसाचे ९४.२७ टक्के क्षेत्रावर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. याशिवाय सोयाबीन, बाजरी, मका व कांदा यांचेही नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना सुमारे दीड हजार कोटींपेक्षा अधिक फटका बसला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सरकारच्या मदतीचा कितीही टेकू दिला तरी झालेली हानी भरून निघणार नाही, अशी भावना शेतकरी उपस्थित करत आहेत. नगर जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात साधारण कापूस, सोयाबीन, बाजरी, भात, मका या पिकांचा प्रामुख्याने समावेश असतो. आक्टोबर महिन्यात झालेल्या सतत महिनाभराच्या पावसाने खरिपातील बाजरी, कापूस, सोयाबीन, तूर, मका, कांदा यासह भाजीपाला, फळबागांसह रब्बीमध्ये नुकतीच पेरणी केलेल्या ज्वारी, हरभऱ्याचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यांनुसार एकट्या नगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने जिल्ह्यातील १५८३ गावांतील सुमारे सहा लाख ३६ हजार १४६ शेतकऱ्यांच्या ४ लाख ५४ हजार १२ हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.  यंदा पावसामुळे प्रतिहेक्टरवरील साधारण आठ क्विंटल कापूस वाया गेला असून त्यामुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांना सुमारे पाचशे कोटींचा फटका बसल्याचा अंदाज आहे. लागवड केलेल्या क्षेत्राच्या तुलनेत सोयाबीनचे ७९ टक्के नुकसान झाले. त्यामुळे सव्वादोनशे कोटी, बाजरीचे ३१ टक्के नुकसान झाले असून त्यातून ८० कोटी, भाताचे ७२ टक्के नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. इतर खरीप व रब्बीमधील पिके फळबागांचा विचार केला तर नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाने सर्वाधिक कापसाचे १ लाख ४३ हजार ७६२ म्हणजे तब्बल ९४. २७ टक्के नुकसान झाले आहे. जिल्ह्यामधील पाथर्डी, शेवगाव, जामखेड, पारनेर तालुक्यात बहुतांश शेतकरी कापसाच्या अर्थकारणावरच अवलंबून आहेत. रब्बी पिकांचेही नुकसान अवकाळी पावसाने खरिपातील पिकांचे तर नुकसान झालेच, पण रब्बीत पेरलेल्या ज्वारी, हरभऱ्याचेही नुकसान झाले आहे. ज्वारीचे पावसाने १७ हजार ८६३ म्हणजे पेरलेल्या ज्वारीच्या तुलनेत ९ टक्के तर हरभऱ्याचे ३०१ हेक्टरवर म्हणजे ३ टक्के नुकसान झाल्याने रब्बीत नव्याने पेरलेल्या ठिकाणचे नुकसान झाल्याने तेथेही दुबार पेरणी केली जात आहे. लागवड क्षेत्राच्या तुलनेत हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान (कंसात टक्केवारी)

भात  १२७७० (७२.४६)
बाजरी ५०१२४ (३१.२८)
मका ४७४५३ (५८.४०)
कापूस १४३६७२ (९४.२७)
सोयाबीन ७०६९१ (७९.५१)
कांदा ७३८७२ (७९.७९)
भाजीपाला ७९६५ (४३.४०)
फुलफिके ४६६ (५३.८९)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com