agriculture news in Marathi,cotton crop damage over 45 percent area, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कापसाचे ४५ टक्के क्षेत्रावर मोठे नुकसान

विनोद इंगोले
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

दोन एकरांवरील कापूस तीन हजार रुपये क्‍विंटलने व्यापाऱ्यांनी मागितला. जिल्हा बॅंकेचे दोन लाख रुपयांचे थकीत कर्ज आहे. दिवाळीपर्यंत कापसाच एक बोंडही घरात आले नाही, झाडावरील १०० बोंडांपैकी दोन बोंडांतच कापूस आहे. पंचनामे सुुरू असले तरी भरपाईचं काही खरं नाही.
- साहेबराव खंदारे, लेवा, ता. महागाव, जि. यवतमाळ

नागपूर : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे खरिपात सर्वांत मोठे पीक असलेल्या कापसाचे सुमारे ४५ टक्‍के क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याशिवाय प्रतिकूल हवामानामुळे निविष्ठा खर्च दुप्पट ते तिप्पट झाला आहे. घटलेली उत्पादकता, वाढलेला उत्पादन खर्च आणि पिकांच्या झालेेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना सुमारे ११ हजार कोटींच्या वर थेट फटका बसला आहे.

गेल्या वर्षीच्या कापूस दरातील सुधारणांमुळे शेतकऱ्यांनी यंदा लागवड क्षेत्र वाढविले होते. गेल्या वर्षी कापसाला शेवटच्या टप्प्यात सहा हजार रुपये प्रति क्‍विंटलपर्यंतचा दर मिळाला. या वेळी देखील कापूस खऱ्या अर्थाने नगदी पीक ठरेल, असा विश्‍वास होता. त्यामुळेच गेल्या वर्षीच्या ३९ लाख हेक्‍टरवर क्षेत्रावरून या वर्षी राज्यात ४४ लाख हेक्‍टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली.

परंतु मॉन्सूनोत्तर पावसाने पुरती दाणादाण उडाली. पावसाचा मारा झाल्याने बोंडे सडली; काही ठिकाणी नख्यात असलेला कापूस ओला झाल्याने त्याची प्रत खालावली तर काही ठिकाणी कापूसदेखील काळवंडल्याने त्याला खरेदीदारदेखील उरला नाही. स्टेंपल लेंथ (तंतूची लांबी) हा घटक कापसाच्या विक्रीत महत्त्वाचा असतो; परंतु पावसामुळे अपेक्षित स्टेंपल लेंथ मिळणार नाही.

दृष्टिक्षेपात राज्यातील कापूस नुकसान

  •     एकूण लागवड : ४४ लाख हेक्‍टर
  •     सरासरी उत्पादकता : ४ क्‍विंटल
  •     एकूण उत्पन्न प्रति एकर (बाजारभावाप्रमाणे) : १९२०० रुपये
  •     या वर्षी उत्पादन खर्च प्रति एकर : २५ हजार रुपये.
  •     बाधित पीक टक्के : ४५ टक्के
  •      सध्याचा बाजारभाव : ४८०० रुपये प्रति क्विंटल
  •     हमीभाव दर : ५५५० रुपये प्रति क्विंटल

...असे झाले नुकसान

  •   सततच्या पावसाने बोंडे कुजली; काळी पडली
  •   बोंडांची मोठी गळ; कापसाची प्रत खालावली
  •   मुळे कुजली; अन्नक्रिया ठप्प
  •   झाडावर लाल्या विकृती आणि मर वाढली
  •   बुरशीजन्य रोग वाढले; फवारणी खर्चात तिप्पट वाढ
  •   खतांचा डोस वाढला; मजुरी खर्चात वाढ
  •   पत्ती वाढल्याने हंगाम एक महिना लांबला
  •   उत्पादकतेत मोठी घट; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

प्रतिक्रिया

पावसामुळे पिकाचा उत्पादकता कालावधी वाढला असला, तरी उत्पादकतेवर त्या प्रमाणात परिणाम होणार नाही. दर्जा मात्र काही अंशी खालावणार आहे. त्यामुळे दराच्या बाबतीत निश्‍चित सांगता येणार नाही. परिणामी, उत्पादकता आणि उत्पन्न या दोन वेगवेगळ्या बाबी या वेळी विचारात घ्याव्या लागतील.
- डॉ. विजय वाघमारे, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

कापसाचा हंगाम लांबल्याने गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाची भीती अधिक आहे. सोबतच कापसाची प्रतही खालावल्याने दर अपेक्षित मिळण्याची शक्‍यता कमीच आहे.
- गोविंद वैराळे, ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ, नागपूर


इतर अॅग्रो विशेष
बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासन सेवेत...यावल, जि. जळगाव: केंद्राने ‘एक देश एक बाजार समिती...
‘एचटीबीटी’मुळे कपाशीतील आंतरपिके...पुणे : काळ्याबाजारातून आलेल्या तणनाशक सहनशील (...
केळी पिकात तयार केली ओळखमोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव,जि.सांगली) येथील...
बंदीची प्रक्रिया हवी  सुटसुटीत अन्...केंद्र सरकारने १८ मे रोजी २७ कीडनाशकांच्या बंदीचा...
कृषिसेवक भरतीतील गैरव्यवहारावर पांघरूण...पुणे : राज्यात २०१६ मध्ये झालेल्या कृषिसेवक भरती...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा इशारा पुणे ः मध्य प्रदेश व परिसराच्या वायव्य भागात कमी...
संपूर्ण नियमनमुक्तीची अंमलबजावणी करापुणे:  सर्वच शेतमालाच्या संपूर्ण...
बाजार समिती कायद्यात बदल करण्याची मागणीपुणे: शेतमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
भाजपच्या दूध आंदोलनापासून ‘संघर्ष समिती...नगर ः दुधाच्या दरासाठी सातत्याने आग्रही राहून...
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु...मुंबई: दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत...
बीटी कपाशी बियाणे अप्रमाणित ...अकोला ः या हंगामात बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेल्या...
'नाबार्ड’चा व्यवस्थापक नसल्यास अग्रणी...पुणे: कृषी पायाभूत निधी योजनेला प्रत्येक...
देशातील जलसंपत्तीची माहिती आता एका...पुणे ः केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने देशभरातील...
भाजीपाला रोपांच्या मागणीत वाढकोल्हापूर: कोविडच्या संकटामुळे थांबलेल्या नव्या...
वऱ्हाडात जोरदार, मराठवाड्यात सर्वदूर...पुणे ः राज्यात पावसाने पुन्हा जोर धरण्यास सुरुवात...
`सीसीआय`कडून सहा कोटी क्विंटल कापूस...नागपूर : कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून (सीसीआय)...
अकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...
सदोष बियाण्यांत शेतकरी दोषी कसा? सोयाबीनच्या सदोष बियाण्यांचा विषय यंदा...
बियाणे दहशतवाद गंभीरच!तणनाशक सहनशील अवैध एचटीबीटी कापूस बियाण्याच्या...
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी...