'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी

शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्याऐवजी चेकने चुकारे व्हावे यासाठी आम्ही आग्रही आहोत. प्रशासनीकस्तरावर त्याला मान्यता मिळाल्यास हा निर्णय घेतला जाईल. कापसाची खरेदी २७ नोव्हेंबरपासून होणार आहे. - अनंतराव देशमुख, अध्यक्ष, कापूस पणन महासंघ
कापूस खरेदी
कापूस खरेदी

नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन महासंघाची खरेदी बुधवारच्या (ता. २७) मुहूर्तावर होणार असल्याच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. राज्यात टप्प्याटप्प्याने तब्बल ४२ खरेदी केंद्रे उघडण्यात येणार असून ती यादीदेखील अंतिम झाली आहे. अमरावती येथील सहकारी जिनिंग परिसरात काटापूजनाने खरेदीची सुरुवात होईल.  राज्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे बोंडातच कापूस भिजला. त्यामुळे कापसाची खरेदी आताच केल्यास ओला कापूस मोठ्या प्रमाणात येण्याची भीती आहे. त्यातच कापसाची स्टेपल लेंथ आणि दर्जाही योग्य नसल्याने असा कापूस खरेदी केल्यास त्यापासून तयार गाठींच्या खरेदीसाठी कोणीच तयार होणार नाही. त्यामुळे यावर्षी कापूस पणन महासंघाकडून दिवाळीच्या आधी व त्यानंतरही कापसाच्या खरेदीबाबत अनिश्चितता होती. बाजारात मात्र कापूस कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली. त्यामुळे पणन महासंघाने बाजारात हस्तक्षेप करावा, याकरिता दबाव वाढला होता.  पणन महासंघ स्वतंत्र कापूस खरेदी न करता सीसीआयकरिता एजंट म्हणून खरेदी करतो. त्यामुळे निकृष्ट कापूस खरेदीनंतर त्यापासून तयार गाठींची उचलच सीसीआयने केली नाही तर मग काय, असा प्रश्‍न पणन महासंघासमोर होता. या साऱ्या मुद्यांवर गुरुवारी (ता. १४) मुंबई पणन सचिव अनुपकुमार यांच्याशी कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, उपाध्यक्ष ॲड. सोळंके, संचालक  प्रसन्नजीत पाटील यांनी चर्चा केली. त्यानंतर बुधवारपासून (ता. २७) पणन महासंघ खरेदी केंद्र उघडण्याचे ठरले. कापसात आठ टक्‍क्‍यापर्यंत आर्द्रता असेल तरच हमीभाव दिला जाणार आहे. त्यानंतर प्रती टक्क्‍यानुसार प्रती किलोची किंमत कमी होईल. बारा टक्‍क्‍यांपर्यंत आर्दता असेल तर चार किलोचे हमीभावानुसार पैसे कमी केले जाणार असल्याचे पणनच्या सूत्रांनी सांगितले. कापसाचा हमीभाव ५५५० रुपये असून आर्द्रतेचा विचार करूनच शेतकऱ्यांना पैसे दिले जातील. असे आहेत केंद्र अकोला:    बोरगावमंजू, मानोरा, कारंजा अमरावती:     अमरावती, लेहगाव, अंजनगाव, अचलपूर, वरुड नागपूर:    सावनेर, काटोल, पारशिवणी, उमरेड, फुलगाव नांदेड:     भोकर, तामसा. परभणी:    गंगाखेड, हिंगोली, परभणी वणी:    चिमूर, गोंडपिंपरी यवतमाळ:     यवतमाळ, आर्णी, पुसद, कळंब, उमरखेड खामगाव:     जळगाव जामोद, देऊळगाराजा औरंगाबाद:     बालानगर, तुर्काबाद, सिल्लोड, खामगाव फाटा, चापडगाव. परळी:    माजलगाव, भोपा, धर्मापूरी, गोडगाव हुडा, केज जळगाव    धरणगाव, अमळनेर, दळवेल, भडगाव, येवला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com