नांदेड जिल्ह्यात पीकविमा परतावा आजपासून जमा होणार

नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी झालेल्यांपैकी जिल्ह्यातील सात लाख ३५ हजार शेतकऱ्यांना सहा पिकांसाठी ४६१ कोटी रुपयांचा परतावा मंजूर झाला.
Crop insurance refunds will be collected in Nanded district from today
Crop insurance refunds will be collected in Nanded district from today

नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी झालेल्यांपैकी जिल्ह्यातील सात लाख ३५ हजार शेतकऱ्यांना सहा पिकांसाठी ४६१ कोटी रुपयांचा परतावा मंजूर झाला. देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे दिवाळीपूर्वी जमा होणारा विमा मिळण्यास विलंब झाला. परंतु आता सोमवारपासून (ता. ८) विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा होईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली. 

जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे खरिपातील सोयाबीन, कापूस, उडीद, तूर, मुग, खरीप ज्वारी या पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यात सरासरीच्या १३४ टक्के पावसाची नोंद झाली. 

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार नऊ लाख दहा हजार शेतकऱ्यांनी खरिपातील सहा पिकांसाठी पीकविमा भरला होता. भरपाईसाठी शेतकऱ्यांनी चार लाखांच्या जवळ नुकसानीबाबत दावे दाखल केले होते. याबाबत विमा कंपनीकडून सर्वेचे काम झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्वरित विमा मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपिन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी शेतकऱ्यांना वेळेत विमा मंजुरीसाठी पाठपुरावा केला. यामुळे राज्यात सर्वाधिक ४६१ कोटींचा विमा परतावा नांदेड जिल्ह्यात मंजूर झाला होता. 

विमा दिवाळीपूर्वी जमा करण्याचे नियोजन होते. परंतु तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य झाले नाही. हा विमा परतावा आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा होईल. ही कार्यवाही दोन ते तीन दिवसांत पूर्ण होईल. - डॉ. विपिन, जिल्हाधिकारी, नांदेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com