agriculture news in Marathi,crop insurance representative not available for farmers, Maharashtra | Agrowon

विमा प्रतिनिधी शोधताना शेतकऱ्यांची दमछाक

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

विमा कंपनीकडे कर्मचाऱ्यांची उपलब्धता कमी असल्याने शुक्रवार (ता. १५) पर्यंत त्यांच्याव्दारे पंचनाम्याचे काम होईल, अशी अपेक्षा आहे. 
- विजय मुखाडे, तालुका कृषी अधिकारी, महागाव, जि. यवतमाळ

यवतमाळ ः मॉन्सूनोत्तर पावसाने झालेल्या नुकसानीचा विमा परतावा मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी ७२ तासांत दस्तऐवजांसह क्‍लेम दाखल केले. आता मात्र पंचनाम्यांसाठी कंपनीचे प्रतिनिधी ‘नॉटरिचेबल’ असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

 महागाव तालुक्‍यात ६८ हजार ४९८ हेक्‍टरवर विविध खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यामध्ये २१ हजार १७५ हेक्‍टर सोयाबीन, २५ हजार २०० हेक्‍टरवर कपाशी व उर्वरित क्षेत्रावर तूर, हळदीसह इतर पिकांचा समावेश आहे. सप्टेंबर तसेच ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या पावसाने बहुतांश क्षेत्रावरील पिकांना फटका बसला. त्या पार्श्‍वभूमीवर भरपाईची मागणी शेतकऱ्यांमधून होत होती. त्याची दखल घेत राज्य शासनाच्या आदेशानुसार प्रत्यक्ष पंचनाम्यांस सुरवात झाली. 

प्रशासनाने केलेल्या प्राथमिक सर्व्हेक्षणानुसार महागाव तालुक्‍यातील ३५ हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. परंतु, प्रत्यक्षात ४८ हजार हेक्‍टवरील पिकांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. सध्या महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून गावपातळीवर पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. परंतु, अधुनमधून येणाऱ्या पावसामुळे पंचनाम्यांचे काम प्रभावीत होत आहे. या आठवड्यात ते पूर्णत्वास जाईल, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्‍त केला जात आहे. असे असले तरी पंचनाम्यांची गती मंदावल्याचे चित्र सर्वदूर अनुभवता येते. 

सुरुवातीला हे काम अवघ्या तीन दिवसांत पूर्ण करण्यात येईल, असा दावा करण्यात आला होता. परंतू, आठवडा लोटल्यानंतरही ते झाले नाही. पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांची स्थिती तर अधिकच वाईट आहे. नुकसानभरपाईसाठी आधी ऑनलाइन पध्दतीत कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यानंतर पंचनाम्यांसाठी विमा कंपनीचा प्रतिनिधी शोधताना देखील शेतकऱ्यांची पुरती दमछाक होत आहे. रब्बी हंगामाची तयारी करण्याऐवजी पंचनामे करण्यासाठी महसूल व विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांमागे धावाधाव करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

 


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...