agriculture news in Marathi,crop insurance representative not available for farmers, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

विमा प्रतिनिधी शोधताना शेतकऱ्यांची दमछाक

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

विमा कंपनीकडे कर्मचाऱ्यांची उपलब्धता कमी असल्याने शुक्रवार (ता. १५) पर्यंत त्यांच्याव्दारे पंचनाम्याचे काम होईल, अशी अपेक्षा आहे. 
- विजय मुखाडे, तालुका कृषी अधिकारी, महागाव, जि. यवतमाळ

यवतमाळ ः मॉन्सूनोत्तर पावसाने झालेल्या नुकसानीचा विमा परतावा मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी ७२ तासांत दस्तऐवजांसह क्‍लेम दाखल केले. आता मात्र पंचनाम्यांसाठी कंपनीचे प्रतिनिधी ‘नॉटरिचेबल’ असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

 महागाव तालुक्‍यात ६८ हजार ४९८ हेक्‍टरवर विविध खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यामध्ये २१ हजार १७५ हेक्‍टर सोयाबीन, २५ हजार २०० हेक्‍टरवर कपाशी व उर्वरित क्षेत्रावर तूर, हळदीसह इतर पिकांचा समावेश आहे. सप्टेंबर तसेच ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या पावसाने बहुतांश क्षेत्रावरील पिकांना फटका बसला. त्या पार्श्‍वभूमीवर भरपाईची मागणी शेतकऱ्यांमधून होत होती. त्याची दखल घेत राज्य शासनाच्या आदेशानुसार प्रत्यक्ष पंचनाम्यांस सुरवात झाली. 

प्रशासनाने केलेल्या प्राथमिक सर्व्हेक्षणानुसार महागाव तालुक्‍यातील ३५ हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. परंतु, प्रत्यक्षात ४८ हजार हेक्‍टवरील पिकांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. सध्या महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून गावपातळीवर पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. परंतु, अधुनमधून येणाऱ्या पावसामुळे पंचनाम्यांचे काम प्रभावीत होत आहे. या आठवड्यात ते पूर्णत्वास जाईल, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्‍त केला जात आहे. असे असले तरी पंचनाम्यांची गती मंदावल्याचे चित्र सर्वदूर अनुभवता येते. 

सुरुवातीला हे काम अवघ्या तीन दिवसांत पूर्ण करण्यात येईल, असा दावा करण्यात आला होता. परंतू, आठवडा लोटल्यानंतरही ते झाले नाही. पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांची स्थिती तर अधिकच वाईट आहे. नुकसानभरपाईसाठी आधी ऑनलाइन पध्दतीत कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यानंतर पंचनाम्यांसाठी विमा कंपनीचा प्रतिनिधी शोधताना देखील शेतकऱ्यांची पुरती दमछाक होत आहे. रब्बी हंगामाची तयारी करण्याऐवजी पंचनामे करण्यासाठी महसूल व विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांमागे धावाधाव करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये मूग, उडदाची आवक नगण्यऔरंगाबाद: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग व...
नाशिकमध्ये हिरवी मिरची २००० ते ५०००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात कांदा, कोथिंबीर, मेथीला उठाव...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांदा १२० ते ४०० रुपये दहा...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत...
नगरमध्ये टोमॅटो, शेवग्याचे दर स्थिरनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पावसाच्या तडाख्याने साताऱ्यात हातची...कऱ्हाड, जि. सातारा ः चांगल्या पावसामुळे यंदाचा...
परभणी जिल्ह्यात पुरामुळे पिके पाण्याखालीपरभणी  : जायकवाडी आणि माजलगाव धरणातील...
सोयाबीन आले सोंगणीला, मात्र उत्पादन...शिरपूरजैन, जि. वाशीम  ः यावर्षी सातत्याने...
वऱ्हाडातील मोठे प्रकल्प तुडुंबअकोला  ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही...
खानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके...जळगाव  ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण...
पुणे विभागात आडसाली ऊस लागवड क्षेत्र...पुणे  ः चालू वर्षी वेळेवर दाखल झालेल्या...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान...सांगली  ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस,...
केळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे...कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून...
वाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी...
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...