agriculture news in Marathi,crushing season may start after Diwali, Maharashtra | Agrowon

दिवाळीनंतरच गाळप हंगाम सुरू होण्याची शक्‍यता

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

कोल्हापूर : पूर परिस्थितीमुळे उसाचे मोठे नुकसान झाल्याने यंदा साखर हंगाम लवकर सुरू करण्याची चर्चा असली तरी दिवाळीनंतरच कारखाने सुरू होण्याची शक्‍यता आहे. यातच निवडणुकीची धामधुमीमुळे अनेक कारखानदार निवडणुकीच्या कामात व्यस्त होण्याची शक्‍यता असल्याने धुराडी दिवाळीनंतरच पेटतील अशी शक्‍यता व्यक्त होत आहे. 

कोल्हापूर : पूर परिस्थितीमुळे उसाचे मोठे नुकसान झाल्याने यंदा साखर हंगाम लवकर सुरू करण्याची चर्चा असली तरी दिवाळीनंतरच कारखाने सुरू होण्याची शक्‍यता आहे. यातच निवडणुकीची धामधुमीमुळे अनेक कारखानदार निवडणुकीच्या कामात व्यस्त होण्याची शक्‍यता असल्याने धुराडी दिवाळीनंतरच पेटतील अशी शक्‍यता व्यक्त होत आहे. 

यंदा महापुराने दक्षिण महाराष्ट्रातील उसाचे मोठे नुकसान झाले. पाणी ओसरल्यानंतर बुडालेल्या उसाचे शंभर टक्केपर्यंत नुकसान झाले. ज्या उसात बऱ्यापैकी पाणी गेले होते. तो ऊस काही दिवस चांगला राहील, असा अंदाज तज्ज्ञांचा होता. पुढील दोन महिन्यांत जर ऊस तातडीने गेला तर काही प्रमाणात उत्पादन हाती लागेल, असा अंदाज उस तज्ज्ञांचा होता.
 
कारखान्यांनी केलेल्या सर्व्हेक्षणातही या उसाबाबतचा तपशील आला होता. अनेक ऊस उत्पादकांनी कारखान्यांकडे उस लवकर गाळपास सुरू करावा ही मागणी केली होती. जर कालावधी वाढला तर बुडालेल्या उसाचे अधिक नुकसान होण्याची शक्‍यता गृहीत धरून कारखान्यांनी कारखाने लवकर सुरू करावेत, अशी मागणी केली होती. परंतु, अद्यापही याबाबत अनेक कारखान्यांमध्ये फारसे धामधुमीचे वातावरण दिसून येत नसल्याचे चित्र आहे. 

कारखाने लवकर सुरू केल्यास निकृष्ट उसाचे गाळप सुरवातीला होईल याचा तोटा कारखान्यांना होणार असल्याने कारखान्यांनी वेळेआधी ऊस तोडणीचे नियोजन काही कालावधीसाठी थांबविल्याची स्थिती आहे. मजुरांचे आगमन हे दिवाळीच्या दरम्यानच होणार असल्याने दिवाळीनंतरच पूर्ण क्षमतेते कारखाने सुरू होतील याचा अंदाज व्यक्त होत आहे. विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्याने याचा हंगामावरही काही अंशी परिणाम होणार आहे.

दक्षिण महाराष्ट्रातील सुमारे नव्वद टक्के कारखानदार हे राजकारणाशी संबधित आहेत. अनेक कारखानादार या वेळी निवडणूक लढविण्याची शक्‍यता आहे. कारखान्याचा अध्यक्ष उभा राहिल्यास त्याच्या प्रचाराच्या नियोजनासाठी संपूर्ण कारखान्याची यंत्रणा राबत असते. यामुळे आता कारखाना लवकर सुरू करण्याचे प्रयत्न होणार नाहीत, असा अंदाज कारखानादार सूत्रांनी व्यक्त केला. 

हंगाम जानेवारी अखेरपर्यंतच?
हंगाम कधीही सुरू झाला तरी यंदा कसा तर जानेवारीपर्यंतच चालेल अशी शक्‍यता आहे. प्रत्येक कारखान्यांच्या क्षेत्रातील सुमारे तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याने हा फटका कारखान्यांना बसू शकतो. यामुळे जादा क्रशिग असणाऱ्या कारखान्यांना कमी क्षमतेवर कारखाने चालविण्याची वेळ येणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.


इतर अॅग्रो विशेष
उद्दिष्ट - मुदतवाढीत अडकवू नका मका...‘‘आ धी नोंदणी केल्यानंतर ११ जुलैला एसएमएस...
मराठवाड्यात कर्ज पुरवठ्याचं घोडं ३७...औरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीक कर्ज पुरवठा...
मुगाचे अर्धेअधिक क्षेत्र रोगाच्या...अकोला : यंदाच्या खरिपात मुगाच्या पिकावर लिफ...
दादाजींचे कुटुंबीय जगतेय केवळ...चंद्रपूर: ‘एचएमटी’सह तब्बल ९ धानाचे वाण विकसित...
सियावर रामचंद्र की जय ! अयोध्येत रंगला...अयोध्या : राम नामाच्या भक्तिसागरात आकंठ बुडालेली...
पालघरमध्ये महावृष्टी; मुंबई, कोकणला...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसाने...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारापुणे : गुजरात ते उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ...
राज्यात ९ ऑगस्टला रानभाज्या महोत्सवमुंबई : औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची विक्री...
अमृत आहार योजनेंतर्गत मोफत दूध भुकटी...मुंबई : राज्यातील दूध दराच्या प्रश्नावर...
प्रयोगशीलतेला प्रयत्नवादाची जोड फळबाग...पुणे जिल्ह्यात धालेवाडी (ता. पुरंदर) येथील संदीप...
बारमाही भाजीपाला शेतीतून आर्थिक बळकटीमेहू (जि.जळगाव) येथील अनिल अर्जून पाटील यांनी २१...
राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे :  राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा...
कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे...कोल्हापूर : बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा...
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत ५१...औरंगाबाद :  मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांतील...
धान खरेदीत मोठी अनियमिततागोंदिया: जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून...
मराठवाड्यात खरिपाची ४८ लाख हेक्टरवर...औरंगाबाद: मराठवाड्यात यंदा ऊस वगळता खरिपाच्या...
शेतकरी न्याय प्राधिकरणासाठी हालचालींना...नागपूर : शेतकऱ्यांच्या फसवणुकीला चाप बसावा...
राज्यात बीएस्सी कृषीची प्रवेश प्रक्रिया...अकोला ः यंदा कोरोनामुळे बीएससी कृषी प्रवेश...
कोकण, मध्य महाराष्ट्राला झोडपलेपुणे ः अरबी समुद्र व उत्तर महाराष्ट्राच्या...
टोमॅटो हंगामावर संभ्रमाचे ढगनाशिक: जिल्ह्यात दरवर्षी पश्चिम पट्ट्यात खरीप...