agriculture news in Marathi,custard apple got setback due to rain, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

पावसाचा सीताफळाला मोठा दणका; २५० कोटींचा थेट फटका

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

माझी एक हजार झाडे असून, झाडावरच सीताफळ परिपक्व होण्याचे प्रमाण वाढले आहे. जो हंगाम ४० दिवस सुरू राहणार होता तो फक्त २० दिवसच सुरू राहणार आहे, तर माल लवकर आणि जास्त निघत असल्याने बाजारभावदेखील कमी झाले आहेत. या हंगामात ७५ ते १०० रुपये दर मिळणे अपेक्षित होते तो दर आता २५-३० रुपये मिळत आहे.
- रमेश निकास, सावत्रा, ता. मेहेकर. जि. बुलढाणा

पुणे : ऑक्टोबर महिन्यातील मॉन्सूनोत्तर पावसामुळे सीताफळाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील सुमारे ३ लाख एकरांवरील सीताफळ बागांना फटका बसला आहे. ५० टक्क्यांपर्यंत नुकसानीचा अंदाज असून, सुमारे २५० कोटींच्या घरात शेतकऱ्यांना फटका बसला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

राज्यात पुण्यासह, औरंगाबाद, बुलडाणा, सोलापूर, सातारा, भंडारा, नगर आदी विविध जिल्‍ह्यांमध्ये सीताफळाचे उत्पादन घेतले जात आहे. या भागात सुमारे तीन लाख एकरांवर लागवड आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात आणि प्रामुख्याने पुरंदर तालुका सीताफळ उत्पादनात अग्रेसर आहे.

जिल्ह्यातील सुमारे २५ हजार एकर क्षेत्र बाधित झाले असून, काढणीला आलेली सुमारे ७० टक्के सीताफळाचे नुकसान झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पुरंदर तालुक्यात सीताफळाचे सुमारे १० हजार एकरवर लागवड आहे. तर इतर तालुक्यांमध्ये सुमारे १५ हजार एकर क्षेत्रावर असे सुमारे २५ हजार एकर क्षेत्रावर लागवड आहे. मॉन्सूनचा वाढलेला मुक्काम, मॉन्सूनोत्तर पावसामुळे सीताफळाच्या बागेत पाणी साठणे, जमिनीतील आणि वातावरणातील आर्द्रतेमुळे फळे १५ ते २० दिवस अगोदरच अकाली उकलण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सुमारे ७० टक्क्यांपर्यंत नुकसानीचा अंदाज सीताफळ तज्ज्ञ डॉ. विकास खैरे यांनी व्यक्त केला आहे. 

खैरे म्हणाले, ‘‘मी नुकताच धालेवाडी, जेजुरी परिसरातील सीताफळ बागांची पाहणी केली. या दरम्यान फळांची अकाली झालेली उकल, काळ्या बुरशीमुळे फळे काळी पडण्याचे प्रमाण वाढलेले दिसले. यामुळे बाजारभाव देखील पडले आहेत. जून ते सप्टेंबरदरम्यान सीताफळाला २० किलोच्या क्रेटला २ ते अडीच हजार रुपये दर होता. हाच दर आता ७०० ते ८०० रुपयांपर्यंत आहे. या दराचा विचार केला, तर शेतकऱ्यांचे सुमारे ७० ते ८० कोटींचे नुकसान झाल्याची भीती आहे.’’ 

वडकीचे शेतकरी संभाजी गायकवाड म्हणाले, ‘‘माझी २ एकर सीताफळ बाग असून, बागेत पाणी साठल्याने झाडांना धोका निर्माण झाला आहे. सध्या फळ काळी पडायला लागली असून, ते प्रमाण वाढण्याचा धोका आहे. सध्या किलोला १० ते ४० रुपये दर मिळत आहेत. 

रघुनाथ चौधरी (रा. खरपुडी, ता. खेड) म्हणाले, ‘‘माझी शेताच्या बांधावर पारंपरिक सुमारे १ हजार झाडे असून, मध्ये पाऊस उघडल्यानंतर वाढलेल्या तापमानामुळे सीताफळ पिकायला लागली होती. त्यातच दोन दिवसांत झालेल्या पावसाने फळे फुटली असून, हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे दरवर्षी मिळणारे दीड-दोन लाखांचे उत्पन्न अजून ३० हजार पण झालेले नाही.

देशात सीताफळ उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर 
अपेडाच्या २०१५-१६ च्या आकडेवारीनुसार देशातील एकूण २ लाख ९७ हजार ९४ टनांच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा हा ३०.९८ टक्के म्हणजेच ९२ हजार ३२० टन एवढा आहे. त्या खालोखाल गुजरात (२०.५३ टक्के), मध्य प्रदेश (१०.०४ टक्के), छत्तीसगड (१३.२८) तेलंगणा (५.३४ टक्के) वाटा आहे.

असे झाले नुकसान

  •   सध्या सीताफळ काढणीचा हंगाम सुरू
  •   जमीन, वातावरणातील आर्द्रता वाढल्याने फळ उकलले
  •   उकललेल्या फळात पाणी गेल्याने सडण्यास प्रारंभ
  •   काळ्या बुरशीच्या प्रादुर्भावाने फळे काळी पडली 
  •   प्रत घसरल्याने बाजारभावदेखील पडले
  •   नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत

प्रमुख उत्पादन/लागवड :       

  • पुणे, औरंगाबाद, बुलडाणा, सोलापूर, सातारा, भंडारा, नगर आदी 
  • एकूण सुमारे तीन लाख एकरवर लागवड 

प्रतिक्रिया

माझी २०० झाडे असून, पावसाने फळे काळी पडली आहेत. बाजारात क्रेटला २ हजार रुपये दर मिळायचा आता फळे झाडावरच फुटल्याने दर क्रेटला ५००-६०० देखील मिळत नाही.
- शेतकरी विक्रम पवार, रा. सिंगापूर, ता. पुरंदर

माझी १७ एकरांवर मिश्र फळबाग असून, यामध्ये सीताफळाची सुमारे साडेतीन हजार झाडे आहेत. नुकत्याच झालेल्या अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे काढणीला आलेली सीताफळे फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. तर पावसामुळे काढणीसाठी बागेत जाणे शक्य न झाल्याने फळे जमिनीवर पडत आहेत. तसेच आता अचानक होणाऱ्या तापमान वाढीमुळे फळ पिकण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे फळांची दूरवर वाहतूक करणे अवघड झाले आहे. बाजारातील आवकदेखील वाढल्याने दर घसरले आहेत. अशा परिस्थितीत सुमारे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे.
- संजय मोरे पाटील, नळविहीर, ता. जाफराबाद, जि. जालना

अवकाळी पावसाने सीताफळ झाडावरच पिकण्याचे प्रमाण वाढले. तर काढणी न होऊ शकल्याने फळे जमिनीवर पडू लागली. तसेच बाजारपेठेत एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्याने दरदेखील ५० टक्क्यांपर्यंत घसरल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. हे नुकसान राज्यात सुमारे २०० ते २५० कोटींपर्यंत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
- श्याम गट्टाणी, महाराष्ट्र राज्य सीताफळ उत्पादक संघ

 


इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
दुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
मॉन्सून मालदिवात दाखल; १ जूनलाच केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत...
भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी...कोल्हापूर: भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात...
लॉकाडाउनमध्येही शेतकऱ्यांकडून शेतमालाची...पुणे (प्रतिनिधी)ः कोरोना टाळेबंदी मध्ये शेतमालाची...
खानदेशात साठा वाढल्याने कापूस, सरकी...जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे...
राज्यातील २८० बाजार समित्या अडचणीत;...लातूर ः राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा...
उष्णतेच्या लाटेमुळे अकोल्यात केळीचे घड...अकोला  ः जिल्ह्यात या आठवड्यात वाढलेल्या...
विदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...
राजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे  : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...
मॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...